नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसची कार्यकारणीत कोणा कोणाचा समावेश होणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यानुसार आज काँग्रेसच्या केंद्रीय समितीने महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेस कार्यकारणीतील नावांना मंजूरी दिली असून यासंबधीची यादीही जाहीर केली. या कार्यकारणीत १८ उपाध्यक्ष, ६५ जनरल सेक्रेटरी, १०४ सचिव, १ खजिनदार आदींसह कार्यकारणी सदस्य आणि १४ …
Read More »दालमियांच्या लाल किल्ल्यावरुन मोदींची पुन्हा फेकाफेकी अमृतकालाचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदींच्या राज्यातील विषकालाचे काय ? सचिन सावंत
मुंबई : प्रतिनिधी ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दालमियांना आंदण दिलेल्या कंटेनधारी लाल किल्ल्यावरून गेल्या ७ वर्षांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याहीवर्षी फेकाफेकी सुरु होती. स्वतःच उद्ध्वस्त केलेल्या वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर उज्ज्वल भविष्याचे स्वप्न दाखवणारे मोदी येत्या २५ वर्षात भारतात अमृत काल येईल असे आश्वासन देत आहेत. परंतु गेल्या ७ वर्षातील मोदी सरकारच्याच …
Read More »सुशांतसिंह प्रकरणाला वर्ष होऊनही सीबीआयचे सोयीस्कर मौन सुशांतसिंह प्रकरणातील चौकशी सद्यस्थिती सीबीआयने तात्काळ स्पष्ट करावी! सचिन सावंत
मुंबई: प्रतिनिधी चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला एक वर्ष पूर्ण झाले असून अद्याप सीबीआय कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहचलेली नाही. एम्स पॅनेलने सुशांतसिंहच्या हत्येला नकार देऊनही ३०० पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. सीबीआय याप्रकरणी अजूनही मुद्दाम मौन बाळगून आहे, त्याच्यामागे कोणाचा दबाव तर नाही ना? अत्यंत प्रतिष्ठेचा मुद्दा केलेल्या सुशांतसिंह …
Read More »जलयुक्त शिवार योजना ही झोलयुक्त योजनाच काँग्रेस ने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर कॅगनंतर चौकशी समितीचेही शिक्कामोर्तब
मुंबई: प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसने वारंवार केला होता. ही योजना कंत्राटदारांचे कुरण झाली होती. त्यावर कॅगच्या अहवालातही शिक्कामोर्तब करत गंभीर ताशेरे ओढले होते. महाविकास आघाडी सरकारने याची दखल घेत माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने …
Read More »प्रश्न करणाऱ्या ईडीलाच काँग्रेसने पाठविली प्रश्नावली तर त्या बारमालकांना अद्याप अटक का नाही? सचिन सावंत
मुंबई : प्रतिनिधी बारमालकांकडून कथितरीत्या जमा केलेले पैसे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले असतील तर मग लाच दिल्याच्या आरोपाखाली ईडीने अद्याप त्या बारमालकांना गजाआड का केले नाही, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत चार प्रश्ने ईडीला विचारले. गेले सात वर्षे मोदी सरकार अस्तित्वात …
Read More »संन्यास घेवू म्हणणारे, धनगर आरक्षणाचे काय झाले? ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हे भाजपाचे पाप
मुंबई, दि. २७ जून ओबीसी समाजाला चार महिन्यांत आरक्षण देईन अन्यथा राजकारणाचा संन्यास घेईन अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा देणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? असा प्रश्न विचारुन ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा …
Read More »पुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा दोन कोटींची जमीन काही मिनिटात १८.५ कोटींची कशी झाली ? सचिन सावंताचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणासाठी जमीन संपादनाच्या कामात घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. दोन कोटी रुपयाची जमीन अवघ्या काही मिनिटातच १८.५ कोटी रुपयांना विकत घेऊन मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या नावावर सर्व मर्यादा सोडून लज्जाहिनतेने भाविकांच्या श्रद्धेशी चालवलेला हा खेळ आहे. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रामाच्या नावावर लोकांच्या …
Read More »मराठा आरक्षणविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्यांचे नागपूर कनेक्शन मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला भाजपाची रसद- काँग्रेस प्रवक्ते सावंत यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेचे व त्यांच्या पदाधिका-यांचे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर कनेक्शन उघड झाले असून यात भाजप पदाधिकारीच अग्रेसर असल्याने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत आरक्षण विरोधी लोकं व संस्थांना रसद पुरवून भाजपानेच मराठा समाजाशी दगाबाजी केली आहे का? असा …
Read More »प्रियांका, कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान मोदींना छत्रपतींची आठवण केवळ मतांकरिताच होते का?- सचिन सावंत यांचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षण प्रश्नावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारवेळा भेटण्याची वेळ मागितली, परंतु आजपर्यंत मोदींनी त्यांना वेळच दिली नाही. चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा, कंगना राणावत व इतर बॉलिवूड अभिनेत्यांना भेट देतात. या सर्व तारकांचे कोणते गहन प्रश्न होते त्यांना मोदींनी वेळ दिला आणि मराठा आरक्षणाकरिता …
Read More »एटीएसला दिलेला DVR परमबीर सिंग यांच्या कार्यालयाने परत का मागून घेतला? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी परमबीरसिंह पोलीस आयुक्त असताना त्यांच्या कार्यालयातून मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाचा DVR गायब झाला असून एनआयए याची चौकशी का करत नाही? गेल्या १८ दिवसापासून एनआयएने सचिन वाझे यांच्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याचा जबाब घेतला नाही, हे आश्चर्याचे आहे. सदर डीव्हीआर गायब करण्यामागे परमबीरसिंह यांचा हात आहे का, याची चौकशी एनआयएने करावी आणि एनआयए करत नसेल …
Read More »
Marathi e-Batmya