मुंबई: प्रतिनिधी सिने अभिनेत्री कंगना राणावत हिने आपल्या ट्वीटमधून तिने आतापर्यंत केलेले कारनामे भारतीय जनता पक्षाला खुश करण्यासाठीच होते, असा कबुलीजबाब दिलेला आहे. “सच मे भाजपा को खुश करके” या तिने वापरलेल्या शब्दांमधून तिला भारतीय जनता पक्षानेच महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी दिली होती. भारतीय जनता पक्षाने लिहिलेल्या पटकथेनुसारच ती महाराष्ट्राची …
Read More »कंगणाला चौकशीसाठी कधी बोलवणार? भाजपाने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी-सचिन सावंत
मुंबई: प्रतिनिधी बॉलिवूड आणि ड्रग कनेक्शन प्रकरणी एनसीबीने मागील तीन चार महिन्यात कलाकार व त्यांच्या संबंधित अनेकांची चौकशी केली. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील पार्टीच्या व्हिडिओवरून एनसीबी चौकशी करत आहे. हा व्हिडिओ दोन वर्षापूर्वीचा आहे, त्यावेळी फडणवीस सरकार होते त्यावेळी चौकशी केली नाही. तर काहींच्या घरी औषधं सापडली त्यांचीही चौकशी केली. …
Read More »… मोदींनी तर आपल्या न्हाव्यालाही रोजगार दिला नाही रावणाचा प्राण जसा नाभीत होता तसाच भाजपाच्या यशाचा आत्मा ईव्हीएममध्ये!: सचिन सावंत.
मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपाचा झालेला पराभव बॅलट पेपरमधील गडबडीमुळे झाल्याची शंका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे. त्यांची ही शंका एका अर्थाने ईव्हीएममधील गडबडीला दुजोरा देणारीच असून ईव्हीएमने मतदान झाले तरच भाजपा विजयी होऊ शकतो असा आहे. रावणाचा प्राण जसा त्याच्या नाभीत होता तसाच …
Read More »मेट्रो कारशेडच्या भाजपा विरोधामागचे काँग्रेसने फोडले बींग भारतीय जनता पक्ष बिल्डरांचे एजंट म्हणून काम करत होते का ? सचिन सावंत यांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी फडणवीस सरकारने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड करिता निर्धारीत असलेल्या जमिनीवर ११ जून २०१९ रोजी मोदी सरकारच्या हाऊसिंग फॉर ऑल २०२२ या उद्दिष्टांकरिता एक लाख परवडणाऱ्या घरांचा शापूरजी पालनजी या बांधकाम व्यावसायिकाने शासनाला दिलेला प्रस्ताव स्विकारून त्यावर अप्पर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठीत केली …
Read More »संसदेचे अधिवेशनच रद्द करणाऱ्या मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार ? आघाडी सरकारला आठवे आश्चर्य म्हणणारा भाजपा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष
मुंबईः प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचा ठेवल्यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविरोधात बोंब ठोकत महाविकास आघाडी सरकारला आठवे आश्चर्य म्हटले. अधिवेशनाच्या कालावधीवरून महाविकास आघाडी सरकारला हिणवणारा भाजपा हा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष आहे. दोन दिवसांच्या अधिवेशनावर टीका करणारे हेच भाजपा नेते आता कोविडमुळे …
Read More »महाराष्ट्राच्या सत्तेची दिवास्वप्ने पाहणाऱ्या फडणवीसांचा भ्रमाचा भोपळा फुटला ...आणि रॉबर्टसेठचा दणदणीत पराभव झाला!:सचिन सावंत
मुंबईः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारला भारतीय जनता पक्ष हा अमर, अकबर, अँथनीचे सरकार म्हणून हिणवत होता. अमर, अकबर, अँथनी जसा हिट चिटपट होता तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे कॉम्बिनेशन हिट झाल्याचे विधान परिषदेच्या आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. या अमर, अकबर, अँथनीनेच रॉबर्ट शेटचा दणदणीत पराभव …
Read More »आरेच्या जागेचा व्यावसायिक उपयोग करण्याचाच फडणवीस सरकारचा डाव होता आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकल्प २० हेक्टरऐवजी ६१ हेक्टर जागेत का केला जात होता? भाजपाला सवाल
मुंबई : प्रतिनिधी मेट्रो कार शेडसाठी आरेची जागा ही फडणवीस सरकारने केवळ व्यावसायिक दृष्टीकोनातूनच निवडली होती. कांजूरमार्ग जागेचा प्रस्ताव जाणीवपूर्वक बारगळू दिला. कांजूरमार्गची जागा घेण्याकरीता खाजगी व्यक्तीला पाच हजार कोटी रुपये द्यावे लागतील हा खोटारडेपणा केला गेला हे आता सिद्ध झालेले आहे. आरे कॉलनीतील मेट्रो प्रकल्प २० हेक्टरमध्ये करणे बंधनकारक …
Read More »शेलार म्हणाले, सचिन सावंत यांनी वेडेपणात सत्य उघड केल्यामुळे त्यांचे आभार! आरेतील भूखंडाचा श्रीखंड खाण्याचा काँग्रेसचा डाव भाजपानेच हाणून पाडला !
मुंबई: प्रतिनिधी आरेच्या जागेचा व्यावसायिक वापर करावा, असा निर्णय तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता, मात्र फडणवीस सरकारने आरेच्या जागेची अंतिम अधिसूचना प्रकाशित करताना आरेच्या जागेच्या व्यावसायिक वापराचा निर्णय रद्द केला. काँग्रेसचा भूखंड खाण्याचा सराईत डाव भाजपाने त्यावेळी हाणून पाडला होता. हे सत्य वेडेपणात, माध्यमातून चमकायच्या नादात सचिन सावंत …
Read More »पाच हजार कोटी रुपये द्यावी लागण्याची फडणवीसांची माहिती खोटी भाजपाच्या दाव्याची काँग्रेसकडून पोलखोल
मुंबईः प्रतिनिधी भाजपा आणि फडणवीस सरकारने मेट्रोच्या आरे कार डेपो संदर्भात मंबईकरांची घोर फसवणूक केली आहे. ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक फडणवीस सरकार मुंबईकरांशी खोटे बोलत राहिले तो प्रकार भयंकर आणि अत्यंत घृणास्पद आहे. मेट्रोचा कार शेड कांजूरमार्गला करण्याचा प्लॅन फडणवीस सरकारचाच होता. ही जागा राज्य सरकारचीच असून त्या जागेवरून कोणताही वाद …
Read More »सुशांतसिंह प्रकरणी महिना झाला तरी ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई? सीबीआय बिहारच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करत आहे का? काँग्रेसचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या दुर्दैवी निधनावर काही मंडळींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला पण ते कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहचू शकले नाहीत. मुंबई पोलीस व कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालावर शंका उपस्थित करत एम्सकडे ते तपासासाठी पाठवण्यात आले पण सुशांतने आत्महत्याच केल्याचा अहवाल एम्सच्या पॅनलनेही दिला. या अहवालाला …
Read More »
Marathi e-Batmya