Tag Archives: satara

बदलीच्या दिवशीच ‘धडाधड’ बदल्या, पोलीस अधीक्षकांकडून नियमबाह्य बदल्यांचा गंभीर आरोप सातारा शिवसेनेची पोलिस महासंचालक आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार

सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची सांगली येथे तडकाफडकी बदली होताच त्यांनी अखेरच्या दिवशीच ‘पॉवर प्ले’ करत त्यांनी आपल्या अधिकारात जिल्ह्यातील सहा ते सात पोलीस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून शिवसेना सातारा जिल्ह्याने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

साताऱ्यात मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यांना भगदाड, मतदारांचा घराणेशाहीला स्पष्ट नकार मंत्री मकरंद पाटील, जयकुमार गोरे यांच्या गडाला धक्का

सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. प्रस्थापित नेत्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना घरी धाडून मतदारांनी विकासाला आणि नव्या चेहऱ्यांना पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः मंत्री मकरंद पाटील यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला असून, महाबळेश्वरच्या तळदेव गटात शिवसेनेच्या (शिंदे गट) अजित …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा राहील. इतर कोणतीही भारतीय भाषा अनिवार्य नसेल, ती ऐच्छिक स्वरूपात राहील. इतर भाषा कोणत्या इयत्तेपासून सुरू करायच्या याबाबतचा निर्णय डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात बदल सातारा येखील शाहुपूरी आणि वृंदावन पोलिस टाऊनशिप मधील नव्या इमारतींचे उद्घाटन

राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत सुंदर व दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यापुढेही पोलीसांसाठी अशाच दर्जेदार सदनिका निर्मितींचे काम अखंडपणे सुरु राहील. या दर्जेदार सदनिकांमुळे पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, महिला डॉक्टरच्या आत्महत्येने गृह विभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर गृहखाते झेपत नसेल तर राजीनामा द्या

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरला पोलिसांच्या अनन्वीत छळाला कंटाळून आत्महत्या कारावी लागली ही घटना पोलीस विभागाला लाज आणणारी आहे. गृहविभागावर फडणवीस यांचे नियंत्रण नाही, फलटणची घटना गृहविभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटावी आणि तात्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन …

Read More »

सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड समुद्रसपाटीपासून उंची १,०९२ मी., पूर्वेकडील बाजूस ३४० मी. आणि पश्चिमेकडे ८७० मी. खोल दरी

सह्याद्रीच्या उंचसखल डोंगररांगांमध्ये, दाट जंगलांच्या कुशीत आणि नागमोडी घाटांच्या वळणावर अभिमानाने उभा असलेला प्रतापगड हा मराठा इतिहासातील एक सोनेरी पान आहे. या गडाचे सामरिक महत्त्व केवळ त्याच्या उंचसखल भौगोलिक रचनेत नाही, तर आजूबाजूच्या दऱ्या, खोऱ्या आणि घाटांवर ठेवलेल्या नियंत्रणातही दडलेले आहे. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्यटकांना पर्यटन सुविधांची माहिती देण्याचे आवाहन

पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाने वर्षभरातील पर्यटनाचे वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव – सोहळ्यांचा समावेश करावा. यासोबतच देशातील टूर ऑपरेटर्स सोबत कार्यशाळा घेऊन त्यांना इथल्या पर्यटन सुविधांची माहिती द्यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकाच पोर्टलवर सर्व पर्यटन सुविधांची माहिती सर्वांसाठी उपलब्ध करुन द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री …

Read More »

जयकुमार गोरे यांची स्पष्टोक्ती, बारामतीची गुलामगिरी स्विकारली असती तर माण खटावला पाणी…. राजकारण संपलं तरी चालेल पण कधीच झुकणार नाही

एका महिलेला अर्धनग्न फोटो पाठविल्याप्रकरणी आणि त्याच महिलेला अटक करायला भाग पाडत, पत्रकार तुषार खरात याच्यासह राष्ट्रवादीचे रोहित पवार, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत याच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव भाजपाचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांनी दाखल केला. त्यापार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून चर्चेत आलेले भाजपाचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांनी …

Read More »

‘जीबीएस’संदर्भात नागरिकांनी घाबरून जाऊ नये आरोग्य यंत्रणेने अलर्ट रहावे-पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन

‘जीबीएस’ आजाराचे संशयित रुग्ण जिल्ह्यात आढळत आहेत. मात्र आरोग्य यंत्रणा सक्षम असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सातारा जिल्ह्यात ‘जीबीएस’ अर्थात गुइलन बॅरे सिंड्रोम या आजाराचे सात संशयित रुग्ण आढळले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण तथा साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आरोग्य यंत्रणेची व्हीसीद्वारे बैठक घेऊन सतर्क …

Read More »

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला महाबळेश्वर आणि पाचगणी मधील समस्यांचा आढावा विविध विकासकामांसाठी महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही नगर परिषदांना निधी उपलब्ध करून देणार

महाबळेश्वर आणि पाचगणी येथील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तसेच इथे येणाऱ्या पर्यटकांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी गेले असता त्यांनी आपल्या निवासस्थानी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी हे …

Read More »