एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत सध्या तरी अनधिकृतरित्या फूट पाडली. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील अनेक नेत्यांनी बंडखोर आमदारांना परत बोलविण्याचे सातत्याने आवाहन करण्यात येत असतानाच मागील एक-दोन दिवसांमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर टीकेची झोड उठविली. यावरून बंडखोर नेते एकनाथ शिंदे …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिवाजी महाराज यांचे नाव घेता मग… आम्ही नात्यात कधी कटुता आणू दिली नाही. जरी पक्ष सोडून गेले तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमाच्याच भावना राहतील
जे सगळे आज पुढे येऊन बोलत आहेत ते आधी राष्ट्रवादीतच होते हे विसरुन चालणार नाही. आम्ही नात्यात कधी कटुता आणू दिली नाही. जरी पक्ष सोडून गेले तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमाच्याच भावना राहतील अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मांडली. आपल्या …
Read More »अचानक झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली ‘या’ विषयावर चर्चा पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या, मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा आढावा
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट पडले असून एक गट एकनाथ शिंदे यांचा तर दुसरा गट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा झाला आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या गटाने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने आता शिवसेनेतील अंतर्गत लढाई न्यायालयीन झाली आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. …
Read More »उदय सामंत म्हणाले, बाळासाहेब आणि उध्दव ठाकरे यांची शिवसेना वाचावी म्हणून… राज्यसभा निवडणूकीतील मतदानावरून साधला निशाणा
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला उपस्थित राहून दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच सूरत मार्गे गुवाहटीला रवाना झालेले शिवसेनेचे मंत्री उदय सांमत यांनी आज आपली भूमिका मांडली. उदय सामंत यांनी भूमिका मांडताना राज्यसभा निवडणूकीचा दाखला देत राज्यसभेत शिवसेनेचे संजय पवार हे आणखी एक सदस्य जाऊ नये …
Read More »पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आवाहन; वेळ गेलेली नाही, कुटुंबप्रमुख म्हणून काळजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचा झेंडा फडकावला. त्यानंतर आता शिवसेना नेमकी कोणाची खरी यावरून एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात अप्रत्यक्ष न्यायालयीन लढाई सुरु झाली. त्यातच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यामुळे …
Read More »आणि शरद पवार यांनी थांबविले मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना राजीनामा देण्यासाठी उध्दव ठाकरे निघाले होते राजभवनावर
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे निर्माण झालेल्या तांत्रिक विषयावर आज सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेतील संभ्रमावस्थेवर जैसे थे असे आदेश देत बंडखोर आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी १२ जुलै पर्यंतची मुदत दिली. तर गटनेते पदी अजय चौधरी आणि प्रतोद पदावरील सुनिल प्रभू यांच्या नियुक्तीवरूनही सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेसह शिवसेनेला नोटीस दिल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी …
Read More »सुधीर मुनगंटीवार यांची स्पष्टोक्ती, त्यांना बंडखोर मानत नाही ते १०० कॅरेट सोनं इतक्यात अविश्वास ठरावाची मागणी नाही -प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची झाली बैठक
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणारे आमदार बंडखोर असल्याचे आम्ही मानत नाही. तसेच ते १०० कॅरेट सोनं असल्याचे सांगत ते सर्वजण शिवसेनेतच आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आहेत. त्यांच्याकडून अद्याप भाजपाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही.भाजपा आजही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. पुढच्या दिवसांत ज्या काही घडामोडी घडतील त्यांच्यावर आमची नजर …
Read More »दिपक केसरकर यांचे खुले पत्र: भाजपाची भलामण, संजय राऊतांवर निशाणा हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी... बंड नव्हे, शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा!
बंडखोरांची बाजू मांडण्यासाठी बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनी आज खुले पत्र लिहित शिवसेनेसाठी भाजपा कशी चांगली आहे आणि हिंदूत्वाच्या मुद्यावर भाजपाबरोबर एकत्र येणे चांगले (?) यासह भाजपा नेते कसे शिवसेनेवर टीका करत नाही आदींसह अनेक मुद्दे मांडत या सर्वामागे संजय राऊत कसे कट कारस्थानी आहेत याचा उल्लेख करत त्यांच्यावर टीकेचा …
Read More »ईडीच्या समन्सनंतर संजय राऊत यांचे आव्हान, मला अटक करा बंडखोरानंतर आता राऊत टार्गेट
राज्यात सत्ता परिवर्तनाच्या उद्देशाने शिवसेनेत एकप्रकारे फूट पाडण्याच्या अनुषंगाने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुळ शिवसेनेतील ३९ आमदार आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना घेवून गुवाहाटी येथे तळ ठोकल्याने राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले. तसेच राऊत …
Read More »राज्यपाल कोश्यारींनी पत्र पाठवित विचारला मविआला जाब; माहिती सादर करण्याचे दिले आदेश विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या पत्राची दखल
शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावित शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना घेऊन आसामची राजधानी गुवाहाटी गाठली. त्यानंतर राज्य सरकारच्या अनेक विभागाकडून मोठ्या प्रमाणावर शासकिय आदेश, निधी वाटपाचे आदेश जारी केले. त्यामुळे हे सारे आदेश कोणत्या आणि कशासाठी …
Read More »
Marathi e-Batmya