Tag Archives: ShivsenaOFC

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल करा मविआचे चांदिवलीचे उमेदवार नसीन खान यांच्या मुख्य पोलींग एजंटची निवडणूक आयोगाकडे तक्रार

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट देऊन शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी रोड शो करून मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री शिंदे यांची हि कृती आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असून मुख्यमंत्री शिंदे व दिलीप लांडेंविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १७१ व लोकप्रतिनिधी कायदा …

Read More »

नांदगांवात समीर भुजबळ यांना सुहास कांदे यांची धमकी… महायुतीतच बेबनाव मतदाराची टक्केवारी वाढविण्यासाठी एकमेकांना आव्हान

साधारणतः ११ वाजल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नांदगांव मधील उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीस उभे टाकलेले समीर भुजबळ यांच्यात आज चांगलीच वादावादी झाली. मतदारांच्या एका गटाला आणण्यावरून दोघांत वादावादीत सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांना तुझा मर्डर फिक्स असल्याची धमकी दिली. झाले असे की, छगन …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचे आवाहन, ५० खोकेवाल्या गद्दारांना धडा शिकवा, भाजपाचाही सुपडा साफ करा काँग्रेस मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंची वसईत प्रचारसभा

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केले. आता विधानसभा निवडणुतही ५० खोकेवाल्या गद्दारांना धडा शिकवून भारतीय जनता पक्षाचा सुपडासाफ करा आणि महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केले आहे. काँग्रेस मविआच्या उमेदवारांसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची वसई येथे …

Read More »

रविंद्र वायकर विरोधातील प्रकरण बंदचा अहवाल न्यायालयाने स्वीकारला जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या आरोपावरून दाखल केला गुन्हा

जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबचा गैरवापर करून पंचतारांकित हॉटेल बांधताना माहिती दडवल्याचा आणि बनावट माहितीच्या आधारे महापालिकेकडून वेगवेगळ्या परवानग्या मान्य केल्याप्रकरणी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार रविंद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात दाखल प्रकरण बंद करण्याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा अहवाल महानगरदंडादाधिकारी न्यायालयाने मान्य केला. त्यामुळे, रविंद्र वायकर यांना दिलासा मिळाला आहे. …

Read More »

“तर मी घरी बसेन” उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन संभाजीनगरातील प्रचारसभेत बोलताना आवाहन केले

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा पक्षाची सर्वाधिक चर्चा होती. मात्र लोकसभा निवडणूकीच्या काळात शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात सर्वाधिक जास्त लक्ष्य केंद्रीत केले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारात आणि शिवसेना उबाठाच्या उमेदवारापैकी कोण जिंकणार याबाबत उत्सुकता होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणार दर्यापूर, मेहकरमध्ये मुख्यमंत्र्यांचा प्रचार सभांचा धडाका

महायुतीचे सरकार शेतकऱ्यांचे असून सरकारच्या तिजोरीवर बळीराजाचा पहिला अधिकार आहे. सोयाबीन कपाशीचे जेव्हा भाव पडतात तेव्हा शेतकऱ्यांना नुकसान होते. त्यासाठी राज्यात भावांतर योजना लागू करुन २० टक्क्यांपर्यंत किंमतीतील तफावत भरुन काढण्यासाठी अनुदान देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार सभेत …

Read More »

अरविंद सावंत यांची अखेर शायना एन सी प्रकरणी जाहिर दिलगिरी; पण या नेत्यांची नावे घेतली शिवसेना शिंदे उमेदवार शायना एन सी यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर व्यक्त केली दिलगिरी

विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे अमिन पटेल यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना शिवसेना उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अरविंद सावंत बोलताना हम इर्म्पोटेड माल का प्रचार नही करते हम ओरिजनल माल का प्रचार करते है असे वक्तव्य केले. वास्तविक पाहता …

Read More »

अरविंद सावंत यांच्या त्या वक्तव्याने शायना एन सी भडकल्या अमिन पटेल यांच्या प्रचारा दरम्यान माल शब्दाचा वापर केल्याने राजकारण पेटले

राज्यातील विधानसभा निवडणूकासाठीची उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख उलटून गेली. तसेच आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख ४ नोंव्हेबर आहे. मात्र दिवाळी सण आणि आजच्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्त आपापल्या मतदारसंघातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आज भर दिला. महाविकास आघाडीचे उमेदवार अमिन पटेल यांच्या प्रचार रॅली दरम्यान त्यांच्यासोबत असलेले …

Read More »

शिंदे गटाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका १९९५ च्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत अनियमितता केल्याचा याचिकेत आरोप

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अॅडजेस्टमेंट म्हणून भाजपाचे माजी नगरसेवक तथा विकासक मुरजी पाटील यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. मात्र मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरताच झोपडपट्टी पुर्नवसन योजने अनियमितता आणि रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप करत मुरजी पटेल यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. …

Read More »

श्रीनिवास वनगा अखेर परतले पण सूर पुन्हा बदललेः आता शिंदे सांगतील ते काम करू उद्धव ठाकरे देव माणूस असे सांगत व्यक्त केली होती खंत

पालघर विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी कापण्यात आली. तसेच श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी कापल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा यांनी आणि घात झाल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे हे देव माणूस असल्याचे सांगत ठाकरे यांना सोडून शिंदेंसोबत …

Read More »