Tag Archives: uddhav thackeray

विधानसभा अध्यक्ष निवडणूकीच्या निमित्ताने उध्दव ठाकरे यांच्याकडून व्हिप जारी एकनाथ शिंदेसह सर्वांना बजावला व्हिप

राज्यात बंडखोर आमदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर बहुमत चाचणीपूर्वी विधानसभा अध्यक्ष पदासाठीची निवडणूक जाहिर झाली. यापार्श्वभूमीवर अध्यक्ष पदासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना आमदार राजन साळवी यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यामुळे राजन साळवी यांना …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही… एकनाथ शिंदे यांच्या कथित दाव्यावरून उध्दव ठाकरे यांचा पलटवार

शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची काल शपथ घेतली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कालच नव्याने मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवरून शुभेच्छाही दिल्या. परंतु राज्यात नव्याने आलेल्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नसल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट …

Read More »

ठाकरेंच्या आव्हानाला भाजपाकडून एकनाथ शिंदेच्या माध्यमातून उत्तर, राज्यात शिदेंसरकार आजच होणार मुख्यमंत्री पदाचा शपथविधी

राज्यातील शिवसेनेतील बंडाळीमुळे अल्पमतात आलेल्या उध्दव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा काल राजीनामा दिला. मात्र काल मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याचे जाहिर करताना माझ्याऐवजी दुसरा मुख्यमंत्री शिवसेनेचाच झाला तर मला आनंदच आहे असे सांगत एकप्रकारे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले. उध्दव ठाकरे यांच्या आव्हानाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यावरून राज ठाकरे म्हणाले, तर त्याचा ऱ्हासाकडे… ट्विट करत नाव न घेता केली टीका

शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमधील अनेक मंत्री आणि आमदारांनी शिंदे गटात सहभागी होणे पसंत केले. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत चाचणी सिध्द करण्याचे दिलेल्या आदेशास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे अल्पमतात आलेल्या उध्दव ठाकरे यांनी काल …

Read More »

बंडखोरांचे प्रवक्ते दिपक केसरकर म्हणाले, तर त्या १६ जणांची आमदारकी धोक्यात उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर सत्तानाट्याला सुरुवात

२४ तासापूर्वी शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या १६  आमदारांवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून अपात्रतेच्या कारवाईचा बडगा उगारला होता. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही लढाई लढली गेली. मात्र ती अद्याप अनिर्णित स्थितीत आहे. तर दुसऱ्याबाजूला उध्दव ठाकरे यांच्या समर्थक असलेल्या आमदारांची संख्याही १६ आहे. आता या १६ …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यावर १२ तासानंतर एकनाथ शिंदे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया गोवा विमानतळावर बोलताना प्रतिक्रिया दिली

सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड क्षमविण्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना अपयश आले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी अखेर काल रात्री ९.३० वाजता आपण राजीनामा देत असल्याचे जाहिर केले. त्यानंतर तब्बल १२ तासानंतर एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. वास्तविक पाहता पक्षप्रमुख ठाकरे …

Read More »

तीन तासाहून अधिक काळ सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद, मात्र मविआला धक्का राज्यपालांच्या आदेशानुसार बहुमत सिध्द करावे लागणार

बहुमत सिध्द करण्याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत सिध्द करण्यासंदर्भात दिलेल्या आदेशाच्या विरोधात शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याप्रकरणी तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुर्यकांत आणि जे.पी. पर्डीवाला यांनी याप्रकरणी तब्बल तीन तासाहून अधिक काळ सर्व याचिकाकर्त्यांची मते ऐकून घेतली. त्यानंतर अखेर महाविकास आघाडी सरकारने उपस्थित …

Read More »

मराठा आरक्षण नोकर भरतीसह ‘हे’ महत्वाचे मंत्रिमंडळ बैठकीत घेतले निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासह अन्य महत्वाचे निर्णय

नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करणार निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळाल्याने बाधित झालेल्या झालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हिल अपील क्र. ३१२३/२०२० मध्ये …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे मोठे निर्णयः औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर आणि… तर विमानतळाला पाटील यांचे नाव, सरकारी वसाहतीत शासकिय कर्मचाऱ्यांना भूखंड

२०१४ साली राज्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेनेच्या सरकारपासून रखडलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न आज अखेर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने सोडवित अखेर करून दाखविले. आज बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचे नामांतर धाराशीव असे करण्यात आले. त्याचबरोबर बहुचर्चित नवी …

Read More »

उध्दव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितले, माझ्या विरोधात मतदान करणाऱ्यांना बघायचाय काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबरील बैठकीत केली भूमिका स्पष्ट

राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सुरु केलेल्या कारवाईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. तसेच त्यासंदर्भातील सुनावणी अद्याप प्रलंबित असतानाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज अचानक महाविकास आघाडी सरकारला आपले बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. त्यामुळे निर्माण झालेल्या पेच प्रसंगावर शिवसेना, …

Read More »