पनवेलमध्ये सर्व बंद तर ठाण्यात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी ठाणे, मीरा-भाईंदर, पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय

पनवेलः प्रतिनिधी
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील पनवेल महापालिकेने शहरातील जीवनावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर ठाणे जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असून मीरा भाईंदर येथील सर्व धार्मिकस्थळे बंद करण्याचा निर्णय या तिन्ही महापालिकांच्या आयुक्तांनी आज घेतला.
पनवेलमधील अत्यावश्यक सेवा वगळता अर्थात जीवनावश्यक वस्तु, बेकरी, दूध डेअरी, किराणा दुकाने, मेडिकल स्टोअर्स, रूग्णालये-क्लिनिक, भाजीपाला इत्यादींची दुकाने चालू ठेवण्यास परवनागी देण्यात आली आहे. याव्यतीरिक्त सर्व दुकाने, आस्थापना बंद करण्याचा निर्णय पनवेलचे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी घेत त्याविषयीचे परिपत्रक जारी केले.
तर ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कोरोनाला रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घालण्याचा निर्णय घेतला. याशिवाय मीरा भाईंदर मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व धार्मिक स्थळांवर प्रार्थना करतांना गर्दी होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, भाजपाने सेंच्युरी मिलची १३ हजार कोटींची जमीन कवडीमोल भावाने बिल्डरच्या घशात घातली सेंच्युरी मिलचा लीज प्रस्ताव ताबडतोब थांबवा आणि गिरणी कामगारांचे ऑनसाइट पुनर्वसन सुनिश्चित करा

मोदी सरकार सरकारने सत्तेत आल्यापासून देशाची सार्वजनिक संपत्ती खास उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सपाटा लावला असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *