राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या ओएसडीविरोधात विनयभंगाची तक्रार दोन महिने झाले तरी म्हाडाकडून निर्णय नाही

मुंबईः विशेष प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळातील एकापेक्षा अधिक बायका केल्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मंत्री चर्चेत असताना आता राष्ट्रवादीच्याच आणखी एका मंत्र्याचा ओएसडी अर्थात विशेष कार्यकारी अधिकाऱ्याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सदरचा ओसएसडी हा मुलतः म्हाडाचा कर्मचारी असून याच प्राधिकरणाशी संबधित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याचा ओएसडी म्हणून काम पहात असून सध्या या भागात चांगलाच दरारा असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच संबधित ओएसडी शासकिय कामकाजाबरोबर अशासकिय कामकाजही मंत्र्यासाठी करत असल्याची चर्चा म्हाडासह मंत्रालयात सुरु आहे.
विशेष म्हणजे आपल्याच विभागात कार्यरत असलेल्या महिला सहकाऱ्याला एका खोलीत बोलावून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच मंत्र्यांकडे असलेल्या ओएसडी पदाचा जोरही सदर महिलेला दाखविल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात सदर महिलेने त्या ओएसडीच्या विरोधात विनयभंगाची तक्रार केल्यानंतर म्हाडाकडून दोन वेळा सुनावणी घेण्यात आली. मात्र त्या सुणावनीत आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या ओएसडीला अनुकूल होतील अशाच पध्दतीची कार्यपध्दती समितीकडून जाणीवपूर्वक वापरण्यात आल्याने सदर महिलेला मानसिक त्रासास सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

उपपंतप्रधान इशाक दार यांच्याकडून सौदी, तुर्कस्थान आणि इजिप्तशी प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्यावर चर्चा तीन देशांशी संरक्षण सहकार्य करार मक्का येथे पाकिस्तान करणार

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी रविवारी सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि इजिप्तच्या परराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *