शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम असा राहणार

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य दिवंगत शरद नामदेव रणपिसे यांचे २३ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेकरिता भारत निवडणूक आयोगाने ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे.

या निवडणुकीचे मतदान २९ नोव्हेंबर २०२१ (सोमवार) रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत व मतमोजणी त्याच दिवशी २९ नोव्हेंबर २०२१ (सोमवार) रोजी सांयकाळी ५.०० वाजता होणार आहे.

नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिवस मंगळवारी, १६ नोव्हेंबर २०२१ आहे. बुधवारी १७ नोव्हेंबर २०२१ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस सोमवार, २२ नोव्हेंबर,२०२१ असा आहे. या निवडणूकीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बुधवार १ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण होईल.

भारत निवडणूक आयोगाने कोविड-19 संदर्भातील विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे तसेच यासंदर्भात अलीकडेच २८ सप्टेंबर २०२१ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. या मार्गदर्शक सूचना https://eci.gov.in/candidate-political-parties/instructions-on-covid-१९/. संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, SIR च्या माध्यमातून ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली; लोकशाहीचा गळा घोटण्याचा डाव संशयास्पद मतदारांची नावे मतदारसंघ व बुथनिहाय प्रसिद्ध करा, दावे व हरकतीसाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून द्या

भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळून, त्यांना मतदानाच्या संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *