सुधीर मुंनगंटीवार म्हणाले, एकनाथ खडसे यांनी ४० वर्षे काम केले… विधान परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवारांनी दावा फेटाळून लावला

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे हे देखील राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात आहेत. तसेच यासंदर्भात बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपातून आपल्याला आपल्या जून्या समर्थकांकडून मतदान केले जाईल असा दावा केला.

या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी भाजपाचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवर यांना भाजपाचे ६ आमदार खडसेंना मतदान करण्याच्या दाव्यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, एकनाथ खडसेंनी ४० वर्षे भाजपाचं काम केल्याने त्यांच्याशी भाजपाच्या आमदारांचे संबंध असणे गैर नाही. तसेच असं असलं तरी ते खडसेंना मतदान करणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

सोमवारी विधान परिषदेच्या १० जागांसाठी विधानभवनात आज मतदान केल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

अपक्ष आमदार व महाविकास आघाडीच्या असंतुष्ट आमदारांनी या सरकारला राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेत धक्का देण्याची सूचना केली. म्हणून भाजपाने या नियोजनाच्या आधारावर, सहकार्याच्या आश्वासनावर पाचवा उमेदवार उभा केला आहे. आम्हाला विश्वास आहे की राज्यसभेप्रमाणे याही निवडणुकीत भाजपाचे सर्व उमेदवार विजयी होतील. विकासाच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू या भावनेतून आम्ही काम करत आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

एकनाथ खडसेंना सहा मतं भाजपातून मिळणार असल्याच्या चर्चेवरही सुधीर मुनगंटीवारांनी प्रतिक्रिया दिली. भाजपाचे आमदार किंवा कार्यकर्ते कधीही पक्षाच्या धोरणा विरोधात वागत नाहीत हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. एकनाथ खडसेंनी ४० वर्षे भाजपाचं काम केल्यानं त्यांच्याशी भाजपाच्या आमदारांचे संबंध असणे गैर नाही. मात्र, यासंबंधांमधून भाजपाचे आमदार त्यांना मतदान करतील असं भाजपाच्या परंपरेनुसार कधीही शक्य नाही असे स्पष्ट करत एकनाथ खडसे यांचा दावा फेटाळून लावला.

About Editor

Check Also

अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार अंबाझरी तलावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी

नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरी तलावाकडे पाहिले जाते. पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा नागनदीवरील धरण किंवा साठवण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *