न्यायालयाच्या आदेशावर राहुल नार्वेकर म्हणाले, मला नोटीस मिळाली… दोन आठवड्यात उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

शिवसेनेच्या ठाकरे गटाने बंडखोर शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिरंगाई न करता तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर शुक्रवारी १४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना नोटीस बजावत न्यायालयात दाखल प्रकरणावर दोन आठवड्यात म्हणणं मांडण्यास सांगितलं. आता या नोटीसबाबत राहुल नार्वेकरांना विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

राहुल नार्वेकर म्हणाले, मला माध्यमांमधून समजलं की, आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात दाखल याचिकेची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विचारले असता ते म्हणाले, माझ्यापर्यंत अद्याप कोणतीही नोटीस आलेली नाही. त्यामुळे नोटीसचा संपूर्ण अभ्यास करून मी यावर पुढील निर्णय घेईन, असं मत व्यक्त केलं.

विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी अपात्रतेबाबत शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस बजावली होती. त्या नोटीसवर शिंदे गटाच्या आमदारांनी उत्तरं दिली का? असा प्रश्न विचारला असता राहुल नार्वेकर म्हणाले, याबाबत विधिमंडळ सचिवालयाकडून माहिती घ्यावी लागेल.

About Editor

Check Also

रोहित पवार यांची टीका, भरलेल्या हप्त्याएवढे सुद्धा पैसे परत आले नाहीत पावसाची तूट आणि ७७ हजार कोटींचे नुकसान, शेतकऱ्यांना अद्याप मदत जाहिर नाही

राज्यातील शेतकरी आणि दुष्काळी परिस्थितीवरून आदरणीय शरद पवार साहेब यांनी आमच्यासोबत आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *