मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त २६ हजार रूपये सानुग्रह अनुदान महापालिका कर्मचाऱ्यांना पाच लाख रूपयांपर्यंत गटविमा योजना लागू करण्याचाही निर्णय

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीनिमित्त २६ हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्याचबरोबर महापालिका कर्मचाऱ्यांना पाच लाख रूपयांपर्यंत गटविमा योजना लागू करण्याचा निर्णयही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.
वर्षा निवासस्थानी मुंबई महापालिकेच्या विविध कर्मचारी आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त आय एस चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के एच गोविंदराज, बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल, माजी आमदार किरण पावसकर यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गेल्या वर्षी दिवाळी सानुग्रह अनुदान देताना पहिल्यांदाच २५०० ने वाढ करण्यात आली होती. यावर्षी त्यात वाढ करून २६ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी रोजंदारीवर काम करणाऱ्या बहुउद्देशीय कामागारांना देखील सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली त्यावर रुग्णालय बहुउद्देशीय कामगार आणि बालवाडी शिक्षिकांना दिवाळी भेट देण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निर्देश दिले.
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना लागू असलेली गट विमा योजना २०१७ पासून बंद होती. ती पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देतानाच त्यात वाढ करून पाच लाखापर्यंतची गट विमा योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आणि ही योजना जानेवारी २०२४ पासून लागू करण्याबाबत प्रशासनाला मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश दिले. आशा सेविका यांना एक महिन्याचे वेतन सानुग्रह अनुदान देण्याबाबतही याबैठकीत निर्णय घेण्यात आला.
महापालिकेच्या कामगार वसाहतींमध्ये नियमीत स्वच्छता करतानाच तेथील शौचालये, स्वच्छतागृहे यांची दुरुस्ती देखील करण्यात यावी,  असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सफाई कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी यासाठी शिष्यवृती देण्याची देखील कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

About Marathi E Batmya

Check Also

छगन भुजबळ यांची मागणी, राज्यात पीएनजी नेटवर्क वाढीसाठी केंद्र शासनाकडून आर्थिक पाठबळ आवश्यक निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे

पीएनजी नेटवर्कचा राज्यभर विस्तार अधिक वेगाने करण्यासाठी केंद्र शासनाकडून तांत्रिक सहाय्य तसेच पायाभूत सुविधा उभारणीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *