दूध दरप्रश्नी विरोधकांनी वाजविली सरकारची घंटा घंटानादाने विधानभवनाचा परिसर दणाणला

नागपूर : प्रतिनिधी

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूधाला वाढीव दर द्यावा, ५ रूपये थेट अनुदान द्यावे या मागणीवरून विरोधकांनी विधानसभेत सरकारला चांगलेच कोंडीत पकडले. मात्र राज्य सरकारकडून याबाबत तातडीने निर्णय घेण्यास टाळाटाळ सुरु केल्याच्या विरोधात सर्व विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर घंटानाद आंदोलन करत सरकारविरोधी घोषणाबाजी केली. विरोधकांच्या या आंदोलनामुळे विधानभवनाचा परिसर दणाणून गेला.

सभागृहात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी दूध दरवाढीच्या प्रश्नावर सरकारला चांगलेच धारेवर धरले. मात्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विरोधकांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी उद्यापर्यंत थांबण्याचे आश्वासन दिले.परंतु शिवसेना आणि सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनास विरोधकांना जबाबदार धरल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

त्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर येवून सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन सुरु केले. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी केली. गाय ही दूध देते मात्र तीला बोलता येत नसल्याने सरकारचे दूध प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन करत असल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी व्यक्त केली.

About Rajesh Salgaonkar

Check Also

अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार अंबाझरी तलावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी

नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरी तलावाकडे पाहिले जाते. पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा नागनदीवरील धरण किंवा साठवण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *