अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेन यांचा कार्यकाळ संपत आला असून आता तेथील अध्यक्षिय निवडणूकांची लगबग सुरु आहे. अमेरिकेत ईव्हिएम मशिन्सबरोबर बँलेट पेपरचा वापरही निवडणूकीच्या कालावधीत केला जातो. मात्र पार्तो रिको येथील एका प्राथमिक निवडणूकीत वारण्यात आलेल्या ईव्हिएम मशिन्समध्ये गैरवापर केल्याचा मुद्दा रॉबर्ट एफ केनेडी यांनी एक्सवर ट्विट करत उपस्थित केला. त्यावर प्रसिध्द टेल्सा कारचे निर्माते आणि स्टारलिंकचे प्रमुख एलोन मस्क यांनीही ईव्हिएम मशिन्सचा निवडणूकीत वापरण्याचे बंद केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
पाच वर्षापूर्वी तेथील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तेथील मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या इव्हिएम मशिन्सवर प्रचंड विश्वास. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत विजयी होतील की काय अशी एकप्रकारची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे तेथील डेमोक्रॅटीक पक्षाच्या समर्थकांनी ज्यो बिडेन यांना मतदान करताना ईव्हिएम मशिनऐवजी बँलेट पेपरचा वापर करण्याचे आवाहन केले. त्यानुसार तेथील डेमोक्रॅटीक पक्षाच्या समर्थकांनी ज्यो बिडेन यांना मतदान करताना बॅलेट पेपरचा वापर केला. त्यामुळे ज्यो बिडेन यांचा विजय होवू शकला.
दरम्यान अमेरिकेतील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एलोन मस्क यांनी ईव्हिएम मशिन्सच्या बाबत हँकची शक्यताही व्यक्त करत या मशिनमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होऊ शकतो असा संशय व्यक्त करत एआयच्या माध्यमातूनही (पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या भाषेत आई) हॅक केले जाऊ शकते अशी भीती व्यक्त करत निवडणूकीत मतदानासाठी ईव्हिएम मशिन्सचा वापर करणे बंद करावे असे मत व्यक्त केले.
We should eliminate electronic voting machines. The risk of being hacked by humans or AI, while small, is still too high. https://t.co/PHzJsoXpLh
— Elon Musk (@elonmusk) June 15, 2024
Marathi e-Batmya