लडाखमधील ठिकाणांच्या भारतीय नावांवर चीनचा आक्षेप चीनच्या आक्षेपावर परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

केंद्रशासित प्रदेशातील २८ सामरिक ठिकाणांना प्रमाणित नावे देण्याच्या नवी दिल्लीच्या निर्णयावर चीनने आक्षेप घेतल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) ठामपणे सांगितले की, लडाख हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे. सीमेच्या पश्चिम भागातील हे क्षेत्र नेहमीच चीनचे असल्याचा दावा करत बीजिंगने भारताच्या या निर्णयाला बेकायदेशीर म्हटले आहे.

“लडाख केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे. चीनकडून कितीही नकार दिला तरी हे स्थापित सत्य बदलू शकत नाही,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी त्यांच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले. गृह मंत्रालयाच्या निवेदनाचा हवाला देत रणधीर जयस्वाल म्हणाले की, अधिकृत भारतीय नकाशावर ही नावे समाविष्ट करण्याचा निर्णय लडाख केंद्रशासित प्रदेश आणि स्थानिक हितधारकांशी सल्लामसलत करून घेण्यात आला आहे.

पुढे रणधीर जयस्वाल म्हणाले की, “लडाख केंद्रशासित प्रदेशाच्या भारतीय सर्वेक्षण विभागाच्या नकाशावर या ठिकाणांना औपचारिकपणे ओळख देण्याचा उद्देश त्यांची अचूक ओळख सुलभ करणे आणि सर्वसामान्यांमध्ये अधिक चांगली जागरूकता निर्माण करणे हा आहे,” असे सांगितले.

या २८ सामरिक स्थळांमध्ये लडाखमधील विविध पर्वतांची शिखरे, हिमनद्या, खिंडी, दऱ्या आणि इतर भौगोलिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

त्यापैकी गोगरा आणि हॉट स्प्रिंग्ज हे दोन प्रमुख संघर्षस्थळे होती, जी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) होती आणि २०२० च्या सीमा संघर्षाच्या केंद्रस्थानी होती. याच गोष्टीमुळे चीनला कदाचित फटका बसला असावा आणि तो चिडला असावा.

पँगोंग सरोवराच्या परिसराजवळील गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर हा संघर्ष सुरू झाला. यात भारताचे २२ सैनिक शहीद झाले, तर चिनी बाजूची जीवितहानी त्याहून खूप जास्त असल्याचे मानले जाते. या संघर्षात आपले किती सैनिक शहीद झाले, हे चीनने कधीही अधिकृतपणे जाहीर केलेले नाही.

महिनाभर चाललेल्या पडद्यामागील राजनैतिक चर्चेनंतर २०२२ मध्ये दोन्ही बाजूंनी सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरू केली. तेव्हापासून संबंध सुधारत असून, सात वर्षांनंतर ऑगस्टमध्ये ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारताला भेट दिली.

तथापि, शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात दिसलेल्या वरवरच्या सौहार्दानंतरही, भारत आणि चीन यांच्यातील संबंधांवर सीमा तणावाची छाया कायम आहे.

भारताच्या या कृतीवर तीव्र प्रतिक्रिया देताना, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, भारताने एकतर्फी आणि बेकायदेशीरपणे स्थापन केलेल्या “तथाकथित लडाख केंद्रशासित प्रदेशाला” चीनने कधीही मान्यता दिलेली नाही.

‘द ग्लोबल टाइम्स’च्या वृत्तानुसार, माओ म्हणाले, “ही कृती बेकायदेशीर आणि अवैध आहे आणि यामुळे हे सत्य बदलू शकत नाही की चीन-भारत सीमेच्या पश्चिम भागातील संबंधित क्षेत्रे नेहमीच चीनची होती.”

अलिशा गिरी, ब्रांग्सा, चपचिंगल पास, कनिष्क शिखर, करुण पीर पर्वत, कुकसेल, मार्तंड गिरी, पारपिक ग्लेशियर, स्कामरी ग्लेशियर, शचमिरिक पास, श्कोर्गा व्हॅली, जोरावर पीक, देहरा कंपास, ड्राक कार्पो, जोल्मो, जोल्मो, जोल्मोनांग, पोन्चोन्ग, पोर्नांग, पोर्नांग शाक्यश्री गिरी, गुरु रिनपोचे, शामल लुंगपा, यांगपा नदी, मारपा लोत्सवा री, मिलारेपा कांगरी, शिवा री आणि महेश्वरा री.

शामल लुंगपा यांचे वर्णन 1950 च्या दशकातील गस्त आणि स्टेजिंग मार्ग म्हणून केले गेले आहे.

About Editor

Check Also

आरएसएसच्या स्वदेशी जागरण मंचची मागणी, एलॉन मस्कच्या स्टार लिंकला भारतात परवानगी देऊ नका स्टारलिंकच्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटवरील निर्बंध आणि सुरक्षेशी संबंधित देखरेख (surveillance) करणे कठीण

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील निदर्शनांमुळे राजधानीतील कायदा-सुव्यवस्था यंत्रणेवर ताण आलेला असतानाच, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *