एलोन मस्क यांच्या ईव्हीएमबाबतच्या ट्विटला राहुल गांधी यांनी केले रिट्विट उदाहरणा दाखल रविंद्र वायकर यांच्या बातमीचा दिला दाखला

मागील काही वर्षापासून देशात ईव्हीएम मशिन्सबाबतचा संशय बळावत असून या मशिनबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम मशिन हॅक करता येत नसल्याचे छाती ठोकपणे सांगत आहे. मात्र देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत मुंबईतील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवाराच्या मेव्हण्यानेच फोनच्या माध्यमातून ईव्हीएम मशिन्समध्ये हस्तक्षेप केल्याचा नवी माहिती पुढे येत आहे. त्यातच आज प्रसिध्द उद्योगपती एलोन मस्क यांनी ईव्हीएम मशिन्स हॅक केली जावू शकते असे मत जाहिररित्या त्यांच्या एक्सवरून व्यक्त केले. त्यानंतर काही तासातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एलोन मस्क यांचे ते ट्विट रिट्विट करत उत्तर मध्य मुंबईतील निवडणूकीचा दाखला दिला.

एलोन मस्क यांनी अमेरिकेतील एका निवडणूकीत ईव्हीएम मशिन्समध्ये पेपर ट्रेल केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर एलोन मस्क यांनी ईव्हीएम मशिन्स हे एक मनुष्यानेच बनविलेले यंत्र असून या यंत्राला हॅक करता येऊ शकते. त्यासाठी एआयचा वापरही केला जाऊ शकतो. त्यामुळे निवडणूकीच्या मतदानातून ईव्हीएम मशिन्स काढून टाका अशी मागणी केली.

याच संदर्भात राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते तसेच विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्ये यांच्याकडूनही ईव्हीएम मशिन्सवर संशय व्यक्त करत निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेतून बाद करण्याची मागणी केली. तसेच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही ईव्हीएम मशिन्सवर विश्वास व्यक्त करत काही अतिरिक्त सुधारणा करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाला दिल्या.

एलोन मस्क यांनी ईव्हीएम मशिन्सबाबत एक्सवर ट्विट केल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचे ट्विट रिट्विट करत म्हणाले, भारतात ईव्हीएम मशिन एक प्रकारचा ब्लॅक बॉक्स आहे. भारतात त्याची तपासणी कोणीही करू शकत नाही. हा एक गंभीर विषय असून यामुळे येथील निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येऊ शकेल. परंतु घटनात्मक संस्थाच्या जबाबदारी न घेण्याच्या भूमिकेमुळे लोकशाहीची अवस्था दैयनीय बनत चालल्याचे मत व्यक्त केले.

तसेच जोडीला मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील मधील भाजपाप्रणित शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्या मेव्हण्याने केलेल्या गैरप्रकारावर प्रकाश टाकणारे इंग्रजी दैनिकातील वृत्ताचा दाखल राहुल गांधी यांनी दिला आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, २००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र पश्चिम बंगालमधील दंगली या त्याची सुरुवात, डिलिमिटेशन कमिटीत कोणत्या निवृत्त न्यायाधिशाला घ्यायचे त्यांचे नावही सुनिश्चित

भारतभरात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *