प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, महायुतीकडून जातीय फूट पाडण्याचा प्रयत्न ओबीसी - मराठा दंगल घडवून आणण्यात शरद पवार अपयशी

ओबीसी आणि मराठा यांच्यात यशस्वीपणे दंगल घडवून आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अपयशी ठरले असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी करत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीने जातीय फूट पाडून मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा निर्धार केला असल्याचा आरोपही एक्सवर ट्विट करत यावेळी केला.

ॲड. प्रकाश आंबेडकर पुढे आपल्या एक्स खात्यावर म्हणाले की, हे सर्व पक्ष निवडणुकीतील यशासाठी द्वेष, जात आणि रक्तपात घडविण्यावर अवलंबून असतात. राष्ट्रवादीने (शरद पवार) ओबीसी आणि मराठा यांच्यात दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना जातीभेदाचा फायदा घ्यायचा होता आणि आरक्षणाच्या मुद्यावर मात्र मौन पाळायचे होते.

तर पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती असल्यानेच महायुती जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी केला.

About Editor

Check Also

आकाश फुंडकर यांची माहिती, स्थानिक माथाडी भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य द्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन आस्थापनेत माथाडी कामगारांना काम

राज्यात कुठल्याही आस्थापनेत माथाडी कामगारांची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *