नाना पटोले यांची टीका,…गलिच्छ भाषा हिच भाजपाची ‘लाडकी बहीण’बद्दलची विकृत मानसिकता विकृत वसंत देशमुखासह सुजय विखेंवर कडक कारवाई करा, निवडणूक आयोगानेही दखल घ्यावी.

लाडकी बहीण म्हणून मतांसाठी १५०० रुपये देण्याचा गवगवा करणाऱ्या भारतीय जनता पक्ष युतीची माता भगिनींबद्दलची खरी मानसिकता काय आहे हे सर्वांनी ऐकले आहे. भाजपाचा माजी खासदार सुजय विखेच्या संगमनेरमधील सभेत वसंत देशमुख या भाजपा पदाधिकाऱ्याने विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्रीबद्दल अत्यंत हिन, निर्लज्ज व पातळी सोडून भाषा वापरली. वसंत देशमुखांनी वापरलेली भाषा हिच भाजपाची महिलांबद्दलची खरी मानसिकता दाखवते, अशा विकृत मानसिकतेला माता भगिनीच त्यांची जागा दाखवतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

यासंदर्भात भाजपाचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, संगमनेरच्या सभेत विखेच्या कार्यकर्त्याने, “निवडणुकीच्या काळात आम्ही मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही”, अशी थेट धमकी देत तिच्या चारित्र्यावरही शिंतोंडे उडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुजय विखे व्यासपीठावरच होते. अशी वक्तव्य करणारा व्यक्ती वयाने ज्येष्ठ दिसतो. महिलांबद्दल अशी भाषा भाजपावालेच बोलू शकतात, हीच त्यांची संस्कृती असून ब्रिजभूषणपासून गल्ली बोळातल्या पदाधिकाऱ्यांनी ते दाखवून दिले आहे. हा केवळ डॉ. जयश्री थोरात यांचा अपमान नाही तर राज्यातील सर्व महिलांचा अपमान आहे. राज्यातील माता भगिनी या अपमानाचा व्याजासह निवडणुकीत बदला घेतील असेही नाना पटोले म्हणाले.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, संगमनेर प्रकरणी भाजपाकडून आता सारवासारव केली जात आहे पण यामुळे त्यांची मानसिकता बदलणार नाही. पोलीस महासंचालकांनीही पक्षपाती न करता कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करावे. वसंत देशमुख या विकृत व्यक्तीला तात्काळ बेड्या ठोकाव्यात. निवडणूक आयागानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वसंत देशमुख व सुजय विखेवर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग कधी पूर्ण होणार? मुंबईला देशातील प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना विलंब का ?

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होऊन १५ वर्षे झाली तरी अद्याप हा महामार्ग पूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *