संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींवर मकोका कायदाः वाल्मिक कराड ? पाच आरोपींवर मकोका कायद्याखाली होणार कारवाई

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींवर आज मकोका कायदा लागू केला असून आता यापुढे या मारेकऱ्यांवर मकोका खाली कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले. अटकेत असलेल्या सर्व सहा जणांवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी प्रतिक घुले, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे आणि महेश केदार यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर हत्या प्रकरणातील ७ आरोपी सिद्धार्थ सोनावणे यालाही याप्रकरणी सह आरोपी करण्यात आले आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जवळपास एक महिन्याचा कालावधी लोटूला आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी सध्या राज्याच्या विविध भागात जनआक्रोश मोर्चे काढण्यात येत आहे. या मोर्चांमध्ये भाजपाचे सुरेश धस आणि मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी ७ जणांना मकोका कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या सर्व जनआक्रोश मोर्चात सत्ताधारी आणि विरोधकांकडून वाल्मिक कराड याच्यावर आरोप करत आहेत. मात्र वाल्मिक कराड यांची अटक ही संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात झालेली नाही. परंतु वाल्मिक कराड यांच्यावर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे वाल्मिक कराड यांना देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर मात्र मकोका कायदा लागू करण्यात करण्यात आला होता.

या सर्व आरोपींवर मकोका कायद्याखाली कारवाई करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहातच केली होती. त्यानुसार हा गुन्हा आज न्यायालयाने या सहा आरोपींना पुढील कोठडीसाठी न्यायालयात नेले असता या सर्व आरोपींवर मकोका कायदा लावण्यात आला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, विधानभवनात बॉम्बची अफवा ही ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा परिणाम विधानभवनही सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय

इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *