अभिनेता सैफ अली खान यांच्यावर अज्ञाताकडून ६ वेळा चाकूने हल्लाः शस्त्रक्रियेनंतर प्रकृती स्थिर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीकडून घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न

बांद्रा पाली हिल परिसरात राहणाऱ्या बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने सैफ अली खान याच्यावर सहा चाकूने वार केले. त्यात सैफ अली खान याच्या शरीरारावर सहा ठिकाणी जखमा झाल्या. यातील दोन जखमा या गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र रात्रीच सैफ अली खान यास लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खान याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान सैफ अली खान रहात असलेल्या इमारतीत सैफ अली खानचे घर हे १२ व्या मजल्यावर आहे. मध्यरात्रीनंतर सदरचा अज्ञात व्यक्ती हा १२ व्या मजल्यावर पोहोचला आणि त्याने सैफ अली खानच्या घरी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सैफ अली खानच्या घरातील नोकराची आणि त्या अज्ञात व्यक्तीची शाब्दीक चकमक उडाली. त्या आवाजाने घरात झोपलेला सैफ अली खान हा मुख्य दरवाज्याकडे आला. त्यावेळी आलेल्या अज्ञात व्यक्ती आणि सैफ अली खान यांच्यात झटापट झाली. या झटापटीत अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानवर सहा वेळा चाकूने वार केले.
त्यात सैफ हा जखमी झाला. त्यानंतर तो अज्ञात व्यक्ती तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला.

साधारणतः ३-३-३० च्या सुमारात जखमी अवस्थेत सैफ अली खान यास बांद्रा येथील लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सैफ अली खान याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याचे लीलावतीकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान सैफ आणि अज्ञात व्यक्ती यांच्यात झालेल्या झटापटीत सैफ अली खानवर झालेल्या ६ पैकी २ जखमा या गंभीर असल्याचेही सांगण्यात येत आहे.

या घटनेचे वृत्त कळताच सैफ अली खानच्या घरी पोलिस पोहोचले आणि त्यांनी घटनेची माहिती घेण्यास आणि तपासास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी सैफ अली खान याच्या घरात असलेल्या मदतनीसांची चौकशी करून त्या सर्वांचे फोन ताब्यात घेतले. तर त्यापैकी काही जणांना पोलिस स्थानकात नेऊन त्यांचे जबाब घेतले.

मात्र सैफ अली खान रहात असलेल्या इमारतीत तो अज्ञात व्यक्ती कसा घुसला याबाबत वेगवेगळे तर्क लढविण्यात येत आहेत. कोणी म्हणतं तो अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात आधीपासूनच दबा धरून बसला होता. तर काणी जणांच्या मते तो अज्ञात व्यक्ती चोरीच्या उद्देशानेच इमारतीत घुसला होता. तर दोन इमारतींच्या मधोमध असलेल्या एका छोट्या भींतीवरून त्याने आता उडी मारली आणि तो १२ व्या मजल्यापर्यंत पोहोचला.

दरम्यान, सैफ अली खान रहात इमारतीतील सीसीटीव्हीचे फुटेज आणि या भागातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासणीचे काम सुरु आहे. तसेच सैफ अली खानच्या घर आणि परिसरातील हताच्या बोटांचे ठसे पोलिसांकडून गोळा करण्यात आले आहे. तसेच प्रकरणी अधिकच्या तपासासाठी चकमेक फेम आणि बांद्रा झोनचे डिवायएसपी दया नायक यांनी घटनास्थळाला भेट देत तपास आणि सीसीटीव्हींची पाहणी केली.

तसेच पोलिसांनी दुपारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सदरचा तो व्यक्ती चोरीच्या उद्देशानेच सैफ अली खान याच्या घरी गेला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.

About Editor

Check Also

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती, सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली नवीन कामगार संहितेच्या अनुषंगाने नवी नियमावली

नवीन कामगार संहितेच्या अनुषंगाने   सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार असून नियमावलीचा मसूदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *