पोलिस प्रशासन शासन आदेशानुसार काम करते, दबावाखाली नाही पोलिस महासंचालक जायस्वाल यांचे प्रतिपादन

औरंगाबादः प्रतिनिधी
पोलिस यंत्रणा आदेशानुसार काम करते कोणाच्याही दबावाखाली नाही.असे स्पष्टीकरण पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत दिले.
गेल्या काही महान्यांपूर्वी ए.टी.एस आणि सी.बी.आय. ने औरंगाबादेत संयुक्त कारवाई करत डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या खुन प्रकरणी काही संशयित अटक केले होते. यावर भाष्य करतांना त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
मराठवाड्यात निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद आणि नांदेड परिक्षेत्रातील पोलिस अधिक्षक आणि पोलिस आयुक्तांची आढावा बैठक औरंगाबादेत घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आयसिस, आणि इतर दहशतवादी संघटनांद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून सर्वत्र अफवा पसरवल्या जात आहेत. हे मोठ आव्हान सध्या पोलिस प्रशासनासमोर असून या प्रकरणांवर पोलिसांचे कडक लक्ष असल्याचे ते म्हणाले.
दुसर्‍या एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, नोटबंदी नंतर राज्यात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. या वक्तव्याशी आपण सहमत नाही.

About Editor

Check Also

अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार अंबाझरी तलावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी

नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरी तलावाकडे पाहिले जाते. पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा नागनदीवरील धरण किंवा साठवण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *