देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) ने शुक्रवारी (९ मे २०२५) सांगितले की देशात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि इंधन खरेदी करण्यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपांवर नागरिकांकडून पेट्रोल-डिझेलची खरेदी करण्यासाठी रांगेत उभे असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडिओंनी व्हायरल होत आहेत. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेल तेलाचा पुरेसा साठा आणि पुरवठा असल्याचे इंडियन ऑइलने जाहिर केले. तसेच देशभरात पेट्रोल-डिझेल इंधनाचा पुरेसा साठा आहे आणि आमचा पुरवठा मार्ग सुरळीतपणे चालू असल्याची माहिती इंडियन ऑईलने एक्सवर ट्विट करत दिली.
इंडियन ऑईलने आपल्या ट्विटमध्ये असेही सांगितले की, घाबरून पेट्रोल-डिझेलची खरेदी करण्याची गरज नाही, आमच्या सर्व आउटलेटवर इंधन आणि एलपीजी सहज उपलब्ध आहेत. पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या राज्यांमध्ये घाबरून खरेदीची शक्यता जास्त दिसून आली.
८-९ मे च्या मध्यरात्री संपूर्ण पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रास्त्रांचा वापर करून पाकिस्तानच्या सशस्त्र दलांनी अनेक हल्ले केल्यानंतर जम्मू आणि काश्मीर आणि पंजाबमधील अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा बंद करण्यात आला. भारतीय लष्कराने म्हटले आहे की, हे हल्ले “प्रभावीपणे परतवून लावण्यात आले”.
यामुळे तणाव आणि दहशत वाढण्याची भीती निर्माण झाली होती.
इंडियन ऑईलने आपल्या ट्विट मध्ये असेही सांगितले की, शांत राहून आणि अनावश्यक गर्दी टाळून आम्हाला तुमची चांगली सेवा करण्यास मदत करा. यामुळे आमच्या पुरवठा मार्ग सुरळीत चालू राहतील आणि सर्वांना इंधनाचा अखंड पुरवठा सुनिश्चित होईल, असेही स्पष्ट केले.
#IndianOil has ample fuel stocks across the country and our supply lines are operating smoothly.
There is no need for panic buying—fuel and LPG is readily available at all our outlets.
Help us serve you better by staying calm and avoiding unnecessary rush. This will keep our…
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) May 9, 2025
दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने बुधवारी पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर हल्ला केला, जो पाकिस्तानात गेल्या काही दशकांमधील सर्वात मोठा हल्ला आहे. त्यानंतर, पाकिस्तानने डझनभराहून अधिक शहरे आणि गावांमध्ये भारतीय लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे सोडण्याचा प्रयत्न केला, त्यापैकी अनेक हवाई दलाचे तळ आहेत.
या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडियन ऑईलने नागरिकांना शांत राहण्याचा आणि अनावश्यक गर्दी टाळण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे कंपनीला त्यांच्या पुरवठा मार्ग सुरळीत चालू राहण्यास आणि सर्वांना इंधनाचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यास मदत होईल.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने एका निवेदनात आश्वासन दिले आहे की, त्यांच्या विशाल देशव्यापी नेटवर्कमध्ये पुरेसे पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी उपलब्ध आहेत.
देशव्यापी नेटवर्कमधील सर्व बीपीसीएल इंधन स्टेशन आणि एलपीजी वितरक सुरळीतपणे कार्यरत आहेत आणि ग्राहकांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहेत. काळजी करण्याचे किंवा घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. आमचे पुरवठा साखळी ऑपरेशन्स मजबूत आणि कार्यक्षम आहेत, ज्यामुळे अखंड पुरवठा सुनिश्चित होतो. आम्ही सर्व ग्राहकांना शांत राहण्याचे आवाहन करतो. बीपीसीएल ऊर्जा सुलभता आणि विश्वासार्हतेसाठी त्यांच्या वचनबद्धतेवर ठाम आहे, असे त्यात म्हटले आहे.
BPCL assures all citizens that sufficient stock of Petrol, Diesel, CNG, and LPG are available across our nationwide network.
All our Fuel Stations and LPG Distributorships are operating smoothly and are fully equipped to meet the energy needs of consumers.
There is no cause for…
— Bharat Petroleum (@BPCLimited) May 9, 2025
Marathi e-Batmya