शिवसेना उबाठा प्रणित कामगार संघटनेतील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची निवड

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या सदस्य कंपन्यांच्या शेकडो कर्मचा-यांनी मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश कार्यक्रम भाजपा प्रदेश कार्यालयात झाला. या कार्यक्रमात रविंद्र चव्हाण यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या वतीने रविंद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. इंडिगो, स्पाइसजेट, बीडब्ल्यूएफएस तसेच एअर इंडिया च्या कर्मचारी संघटनांच्या सदस्यांनी उबाठा सेनेकडून झालेल्या अन्यायाला कंटाळून भाजपा प्रवेश केल्याचे नमूद केले. यावेळी भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.

यावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले की, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे त्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी कामगार हितासाठी मी जीव तोडून काम करेन. समाजातील शेवटच्या व्यक्तिपर्यंत विकास आणि सरकारी योजनांचा लाभ पोहोचवणे या विचारधारेने केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार काम करत आहे. भाजपाची विचारधारा सर्व कामागारांच्या आयुष्यात बदल घडवू शकते हे कार्यातून दाखवण्यासाठी मी अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारत असल्याचे सांगितले. सर्व कामागारांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण सदैव सोबत उभे राहू अशी ग्वाही ही दिली.

यावेळी कर्मचारी संघ कार्याध्यक्ष जितेंद्र राऊत, कर्मचारी संघ सरचिटणीस सुहास माटे यांनी सांगितले की एक ते दीड वर्षे दोन राजकीय पक्षांच्या चढाओढीत कर्मचारी भरडले जात होते. भाजपाचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण हेच सर्व कर्मचा-यांना न्याय देऊ शकतील असा विश्वास वाटल्याने आम्ही त्यांची कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेतला. सरकार व कामगारांमध्ये उत्तमरित्या संवाद प्रस्थापित होऊन कामगारांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील असा विश्वासही व्यक्त केला.

प्रवेश केलेल्यांमध्ये योगेश आवळे, निशांत गायकवाड, विनोद घोगले, प्रशांत वर्तक, हर्षित तासकर, दिनेश शेवाळे, करण कांबळे, धनंजय कांबळे, संजय राम बहादुर सिंग, युवराज ढोरे, अक्षय काळभोर, अजित आचरेकर, उमेश डाफळे, सतीश बांदल, सुधीर पवार, राजेश पाटील, महेश पवार, महेश मोरे, आदित्य महेश मोरे ,संजय चावणेकर आदींचा समावेश आहे.

About Editor

Check Also

Nagpur Blast

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, स्फोटक कारखान्यांसाठी नियमांमध्ये सुधारणासाठी केंद्राकडे निवेदन स्फोटक कारखान्यातील अपघात टाळण्यासाठी प्रक्रिया ऑटोमेशनवर भर

स्फोटक पदार्थ हाताळण्याच्या प्रक्रियेत ऑटोमेशनवर आधारित उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *