उदय सामंत यांची माहिती, शिक्षकांच्या निवृत्ती वेतन योजनेत सुधारणेविषयी निर्णय लवकरच उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक

राज्यभरातील शिक्षकांच्या निवृत्ती वेतन योजनेत सुधारणा करण्यासंदर्भात राज्य शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य सुधाकर अडबाले यांनी शिक्षकांच्या निवृत्तीवेतन योजनेबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री डॉ. सामंत बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना अंशदान निवृत्ती वेतन योजना राज्य शासनाने १ नोव्हेंबर २००५ पासून लागू केली. त्यानंतर २०१५ पासून ही योजना केंद्र शासनाच्या नवीन निवृत्ती वेतन योजनेमध्ये वर्ग करण्यात आली. शिक्षकांना अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची बाब सध्या अर्थ विभागाच्या विचाराधीन आहे. त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, तसेच महानगरपालिका व नगरपालिकांतील शिक्षकांनाही शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच लाभ मिळावेत यासंदर्भात उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड

वर्षा गायकवाड : काँग्रेस कार्यालयावर भाजपाचा मोर्चा म्हणजे ‘चोर तो चोर वरून शिरजोर’ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर बोलण्याची भाजपाच्या टिनपाट अमित साटमची लायकी नाही – खा. वर्षा गायकवाड

लाखो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला त्याचे उत्तर द्या, स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांना साथ देणाऱ्या भाजपाने काँग्रेसला अक्कल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *