महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर (MACCIA) ने राज्याच्या ग्रामीण आर्थिक लँडस्केपमध्ये बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘गाव तिथे उद्योजक’ मोहिमेची अधिकृत घोषणा केली आहे. एका भव्य पदग्रहण समारंभात (४ जुलै रोजी) ही घोषणा करण्यात आली, जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित एमएसीसीआयए MACCIA अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्याकडे …
Read More »उदय सामंत यांची माहिती, मुंबईत सहा महिन्यात भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र सुरू करणार भटक्या श्वानांवर नियंत्रणासाठी राज्यभर उपाययोजना; निर्बीजीकरण, लसीकरण मोहिमा सुरू
राज्यातील भटक्या श्वानांच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने विविध स्तरांवर व्यापक उपाययोजना सुरू केल्या असून, केंद्र शासनाच्या प्राणी जन्म नियंत्रण नियम, २०२३ तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सर्व नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधानसभेत सदस्य अर्जुन खोतकर …
Read More »उदय सामंत यांची माहिती, केंद्राच्या निधीची प्रतीक्षा न करता विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू मराठीच्या अभिजात दर्जानंतर विकासकामांना गती
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला असून, केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनाने मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे, अशी माहिती उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. म.वि.प. नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेत …
Read More »उदय सामंत यांची माहिती, केईएम रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती
मुंबईतील ऐतिहासिक केईएम (किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालयाचे नाव बदलण्याबाबत राज्य शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सदस्य सचिन अहिर, प्रवीण दरेकर, अनिल परब, बच्चू कडू, प्रसाद लाड यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते. मंत्री उदय …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग- एएम इंटेलिजन्स लॅब यांच्यात सामंजस्य करार महाराष्ट्रात १.१४ लाख कोटींची गुंतवणूक; ८,००० जणांना मिळणार रोजगार!
राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि ‘एएम इंटेलिजन्स लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड’ समवेत १ लाख १४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार आज झाला. मुख्यमंत्री समिती कक्षात झालेल्या या कराराच्या वेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी. अन्बळगण, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, सहसचिव डॉ.श्रीकांत …
Read More »विशाल, अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; १८ प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी महाराष्ट्रात ₹२.५६ लाख कोटींची गुंतवणूक आणि १ लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य
राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल ₹२,५६,१३७.०१ कोटींच्या १८ विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे १ लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, डेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्या मध्य पूर्व आशियातील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी उत्सुक
जगभरातून तसेच प्रामुख्याने मध्य पूर्व आशियातील डेटा सेंटर क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी उत्सुक आहेत. या पार्श्वभूमीवर करार झाल्यानंतर संबंधित कंपन्यांना त्वरित जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे डेटा सेंटर्स संदर्भात सादरीकरण आणि बैठक झाली. यावेळी उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत …
Read More »उदय सामंत यांची माहिती, गट ड मधून पदोन्नती संदर्भात तीन वर्षांची अट करण्याबाबत शासन सकारात्मक ठाणे महानगरालिकेसंदर्भातील चर्चे दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
ठाणे महानगरपालिकेत गट ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी असलेली पाच वर्षांची अट तीन वर्षांवर आणण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना सांगितले. सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी नियम ९७ अन्वये या विषयी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा उपस्थितीत केली होती. ठाणे महापालिकेमध्ये गट ‘ड’ च्या कर्मचाऱ्यांच्या …
Read More »उदय सामंत यांची माहिती, बीएमसी क्षेत्रात एक लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांची विकास कामे सुरू शासनाकडील देय रक्कम महापालिकेस टप्प्याटप्प्याने देणार
मुंबईच्या विकासासाठी आणि नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा देण्यासाठी शासन आणि महानगरपालिका यांच्यात समन्वयाने काम सुरू आहे. मुंबई महापालिकेत सुमारे एक लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची विकास कामे सुरू असून मुंबई महापालिकेस शासनाकडून देय असलेली देय रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाईल, असे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत …
Read More »मोबाईल टॉवर धोरणाबाबत आयटी सचिवांसोबत बैठक घेणार उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन
केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र ‘टॉवर पॉलिसी’ कशी तयार करता येईल याचा अभ्यास सुरु आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिवांसोबत याविषयाबाबत तातडीने बैठक आयोजित करण्यात येईल तसेच राज्यातील अनाधिकृत मोबाईल टॉवर्सचे सर्वेक्षण करण्यात येईल असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभा …
Read More »
Marathi e-Batmya