रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यास राज्य सरकार कटिबद्ध असून, या स्मारकासाठी ३५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री डॉ.उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. याबाबत सदस्य प्रमोद जठार लक्षवेधी सूचना यांनी मांडली. यावेळी चर्चेत सदस्य प्रविण …
Read More »नरहरी झिरवाळ यांची माहिती, हाफकीन प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार हाफकीन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती
हाफकीन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत सांगितले. विधान परिषद सदस्य भाई जगताप यांनी हाफकीन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ते बोलत होते. …
Read More »विधान भवनात मंत्री, आमदारासाठी मुतारी, तिथे जनतेला मुतायची चोरी पावसाळी अधिवेशनात विधान भवनाच्या प्रशासनाकडून आदेश जारी
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनास कालपासून सुरुवातल झाली. काल पहिला दिवस असल्याने विधान भवनाच्या प्रशासनाने कामकाज कमी असल्याने फारसे तगडी सुरक्षा आणि इतर बाबीकडे थोडेसे दुर्लक्ष केले. मात्र आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मात्र विधान भवन प्रशासनाने मात्र चांगलीच सुरक्षा व्यवस्था तैनात केल्याचे दृष्य आमदार आणि मंत्र्याच्या लॉबीसमोर असलेल्या मुतारीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था …
Read More »नितेश राणे यांची माहिती, आंबा-काजू उत्पादक, मच्छीमारांसाठी वाढदिवस साजरा करणार नाही पाऊस लांबला, पाणीटंचाई
कोकणातील आंबा आणि काजू पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मच्छीमारांचे झालेले नुकसान व राज्यातील अनेक भागांमध्ये एल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यंदा २३ जून रोजी होणारा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकरी, …
Read More »पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील सांस्कृतिक कार्यक्रमाचे ३१ मे रोजी रवींद्र नाट्यमंदिरात आयोजन
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयांच्या वतीने रविवार, ३१ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता मिनी थिएटर, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले आहे. भारतीय इतिहासातील आदर्श राज्यकर्त्या, न्यायप्रिय प्रशासक आणि लोककल्याणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील विविध …
Read More »छगन भुजबळ यांची माहिती, पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी मे महिन्यात नेहमीपेक्षा २० टक्के अधिक पेट्रोल-डिझेल विक्री झाल्याची माहिती
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. माध्यमांशी संवाद साधताना छगन …
Read More »नितेश राणे यांची माहिती, जलवाहतूक सेवा होणार डिजिटल ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार
मुंबई महानगर प्रदेशातील जलवाहतूक सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-अनुकूल करण्यासाठी ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वर्सोवा-मढ पारंपरिक तिकीट प्रणाली आधुनिक डिजिटल प्रणालीमध्ये रूपांतरित करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेश मधील प्रवासी जलवाहतूकीसाठी ऑनलाईन तिकीट वितरण, विक्री प्रणाली सुरु करणेबाबत आढावा बैठक …
Read More »आशिष शेलार यांचे आदेश, कोकणातील दुर्गम व डोंगराळ भागातील मोबाईल नेटवर्कसाठी नव्याने सर्वेक्षण तालुकानिहाय नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागांमध्ये मोबाईल नेटवर्कच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी, भारत संचार निगमचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त सहभागातून तालुकानिहाय नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे, तसेच त्यावर आधारित कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क आणि …
Read More »मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश, नदीजोड प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करा कोकण-गोदावरीसह चार महत्त्वाच्या योजनांचा आढावा
राज्यातील महत्वाच्या नदीजोड प्रकल्पांची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. कोकण-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी तसेच कोकण-गोदावरी वळण योजना या नदीजोड प्रकल्पांचा सविस्तर आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा …
Read More »वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी दिव्यांगांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावे यांची माहिती
राज्य शासनाने विशेष सहाय्य अनुदान योजनांअंतर्गत लाभ घेणाऱ्या, परंतु वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अशा लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या कालावधीत त्यांचे अनुदान सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी दिली. …
Read More »
Marathi e-Batmya