प्रताप सरनाईक यांची माहिती, १ ऑगस्ट पासून एसटीच्या डिझेल खरेदीवर सवलत सुरू… तेल कंपन्यांनी सुरु केलेली सवलत योजना एसटी महामंडळाकडून राबविणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत डिझेल खरेदी करीत असलेल्या मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांनी ०१.०८.२०२५ पासून लागू होणाऱ्या दरानुसार डिझेलवर सवलत (discount) देण्याचे आश्वासन दिले होते अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

प्रताप सरनाईक पुढे बोलताना म्हणाले की, त्यानुसार १ ऑगस्ट पासून या कंपन्यांनी ₹३.०० प्रति किलो लिटर (बेंचमार्क दरापेक्षा) सवलतीचा दर देण्यास सुरु केले आहे. त्यामुळे महामंडळास डिझेल खरेदीवर एकूण ₹३.०० प्रति किलो लिटर इतकी सवलत प्राप्त होणार असल्याचेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की ही सवलत ०१.०८.२०२५ पासून पुढे लागू झाली असून त्यामुळे महामंडळाच्या इंधन खर्चात लक्षणीय बचत होणार आहे. याचा सकारात्मक परिणाम महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर होणार असून सेवांचे सुरळीत व आर्थिकदृष्ट्या सक्षम संचालन करता येणार आहे. या संदर्भात महामंडळाच्या सर्व विभागांनी व आगारांनी या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी, असे निर्देशही देण्यात आले.

About Editor

Check Also

नाना पटोले यांचा आरोप, खासगी खाणीकडून ३० लाख मेट्रीक टन कोळसा खरेदीचे टेंडर रद्द करा’ ‘मित्रों’च्या फायद्यासाठी महाग वीज कशासाठी? महाग वीजदरामुळेच राज्यातील उद्योग बाहेरच्या राज्यात गेले; महाग कोळसा घेतल्यास वीजही महागच मिळणार

भाजपा सरकार जनतेला दररोज महागाईचा शॉक देत आहे. साखरेपासून सर्वच्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. सर्वात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *