Tag Archives: परिवहन मंत्री

प्रताप सरनाईक यांची माहिती, २०३७ पर्यंत एसटीची ‘ई-लालपरी’; १०० टक्के इलेक्ट्रिक ताफ्याचे लक्ष्य ५ हजार नवीन डिझेल बसेस ठरणार शेवटच्या

महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाचा ताफा सन २०३७ पर्यंत १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. एसटीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या सुमारे ५ हजार डिझेल बसेस या शेवटच्या डिझेल बसेस ठरणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष …

Read More »

रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, • गोल्डन अवर’मध्ये अपघातग्रस्तांना तातडीने उपचार, • रस्ता सुरक्षा लेखापरीक्षण आणि एकात्मिक रुग्णवाहिका यंत्रणेवर भर

राज्यातील रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य तसेच संबंधित यंत्रणांनी अधिक समन्वयाने काम करावे. अपघात नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, रस्ता सुरक्षा लेखापरीक्षण आणि अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवरमध्ये तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश परिवहन मंत्री तथा राज्य रस्ता सुरक्षा …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, पाच हजार ‘लालपरी’ बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचा ताफा अधिक सक्षम होणार

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी, दर्जेदार आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने बसताफ्याच्या विस्तारासोबतच आधुनिकीकरणाला वेग दिला आहे. नव्या बसेसच्या माध्यमातून एसटीची सेवा अधिक सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्याच दिशेने पाच …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे मत, ‘एसटी’च्या आर्थिक सक्षमतेसाठी विनावाहक बससेवेला प्राधान्य द्या प्रवाशांना अधइक सुलभ आणि गतिमान सेवा उपलब्ध करून द्या

महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी उत्पन्नवाढीवर भर देतानाच खर्चातही काटकसर करणे आवश्यक आहे. त्यासाठी पारंपरिक कार्यपद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन नाविन्यपूर्ण प्रयोग राबवावेत. विशेषतः विनावाहक बससेवेला प्राधान्य देऊन मनुष्यबळावरील खर्चात बचत करण्याबरोबरच प्रवाशांना अधिक सुलभ आणि गतिमान सेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश परिवहन मंत्री …

Read More »

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी फिरवला मराठी शिकण्यासाठी आता एक वर्षाची मुदतवाढ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील अ-मराठी ऑटो आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांना आता व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी अतिरिक्त एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत मराठी न आल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. ऑटो-टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुदतवाढीची विनंती …

Read More »

प्रताप सरनाईक यांचा इशारा, रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलता न आल्यास बॅज निलंबित करणार २० ऑगस्टपासून नियमाची अंमलबजावणी

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य असून, या नियमाची अंमलबजावणी उद्या, २० ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम एक महिन्याची नोटीस देण्यात येईल. या कालावधीत मराठीचे ज्ञान प्राप्त न केल्यास त्यांचा बॅज तीन महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल. त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटीच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन ११ ऑगस्टला खात्यात जमा होणार दर महिन्याला होणाऱ्या ७ तारखेऐवजी आता ११ ऑगस्ट होणार जमा

दर महिन्याच्या ७ तारखेला अदा होणारे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रशासकीय दिरंगाई आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे यंदा काहीसे लांबले. मात्र, एसटी महामंडळाच्या तब्बल ८६ हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन उद्या, ११ ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रताप …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले व्यवहारिक मराठीचे धडे १५ ऑगस्टपर्यंत उर्वरित चालकांना सुवर्णसंधी

“महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो,” अशा भावनिक शब्दांत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला’ मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रताप सरनाईक म्हणाले की, …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे आवाहन, १ सप्टेंबरपर्यंत ॲग्रीगेटर कंपन्यांनी नोंदणी करावी; अन्यथा कठोर कारवाई

राज्यातील ॲग्रीगेटर आधारित प्रवासी वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक व नियमबद्ध करण्यासाठी राज्य शासनाच्या ॲग्रीगेटर धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून, राज्यात कार्यरत सर्व ॲग्रीगेटर कंपन्यांनी १ सप्टेंबर २०२६ पर्यंत विहित प्रक्रियेनुसार परिवहन विभागाकडे नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर विनानोंदणी अथवा नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या ॲग्रीगेटर कंपन्या आणि संबंधित वाहनांवर कठोर कायदेशीर कारवाई …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप …

Read More »