व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाण नियमित प्रमाणे सुरू आखाती देशातील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण सूचना

आखाती देशातील युद्ध सदृश्य परिस्थितीमुळे मागील काही दिवस प्रलंबित झालेली विमान सेवा व विमान उड्डाण सुरू झाली आहेत.व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाणे नियमित सुरू झाल्याने भारतीय नागरिक, पर्यटक व प्रवासी भारतात येण्यासाठी आवश्यकतेनुसार थेट तिकीट आरक्षित करू शकतात, असे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

आखाती विविध देशात अडकलेल्या प्रवाशांना याबाबत सहाय्य व अधिक माहितीसाठी असल्यास संबंधित देशातील भारतीय दूतावास अथवा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयास संपर्क साधावा, याबाबत माहिती महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्तकालीन कार्य केंद्राच्या( SEOC )वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या विरोधात कठोर भूमिका घेत इराणवरील हल्ल्ये मोठ्या प्रमाणावर वाढविले होते. त्यामुळे इराण आणि आखाती देशात व्यावसायिक आणि इतर कारणाने इतर देशाचे गेलेल्या नागरिकांना वाचविण्याच्या उद्देशाने परत आणण्याच्या मोहिमा विविध देशांकडून आखण्यात आल्या. तसेच त्यासाठी तेथील राजदूतांच्या कार्यालयांनाही तशा सूचना देण्यात आल्या होत्या.

विशेषतः अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या विरोधात कडक भूमिका स्विकारत इराणवर क्षेपणास्त्र हल्ले वाढविले. यातील एका हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि काही इराणी लष्करी अधिकारी त्या हल्ल्यात ठार झाले. मात्र आता इराण आणि अमेरिका, इस्रायलने आपल्या भूमिकेत काहीशी नरमाई स्विकारल्याने मध्यपूर्व आणि अरब राष्ट्रात पुन्हा एखदा प्रवाशी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

About Editor

Check Also

डोनाल्ड ट्रम्प यांची टीका, इराण आता मध्य पूर्वेतील पराभूत राष्ट्र इराणच्या अध्यक्षांनी शेजारील राष्ट्रांची माफी मागितल्यानंतर ट्रम्प यांचे वक्तव्य

चालू युद्धात अविरत हल्ल्यांसाठी इराणने आपल्या आखाती शेजाऱ्यांकडून माफी मागितल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *