आदिती तटकरे यांचे आवाहन, ईकेवायसीच्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी (EKYC) करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून, महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

पुढे बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. मात्र, ईकेवायसी (EKYC) करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसून, महिला मोबाईलवरून स्वतः ईकेवायसी (EKYC) करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकतात, असेही यावेळी सांगितले.

आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ईकेवायसी (EKYC) च्या बहाण्याने लाभार्थी महिलांकडून गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यानुसार दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

शेवटी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, “ईकेवायसी (EKYC) करून देतो” असे सांगून काहीजण महिलांची दिशाभूल करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये तसेच खोट्या भूलथापांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांची मागणी, राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज रद्द करण्याचा निर्णय घ्यावा मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवित केली मागणी

कठीण आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *