प्रताप सरनाईक यांचे आश्वासन, २०३५ पर्यंत राज्यातील सर्व एसटी बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक होणार एसटी महामंडळाने ५,१५० इलेक्ट्रिक बस घेण्याचा करार

पर्यावरणपूरक, आधुनिक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचा संपूर्ण बस ताफा २०३५ पर्यंत टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य श्रीकांत भारतीय यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य परिणय फुके, सतेज पाटील, प्रविण दरेकर, भावना गवळी, निरंजन डावखरे, उमा खापरे, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, चंद्रकांत रघुवंशी यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एसटी महामंडळाने ५,१५० इलेक्ट्रिक बस घेण्याचा करार केला असून, त्यापैकी ९०० हून अधिक बस महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत. या बसेस यशस्वीपणे प्रवासी सेवा देत आहेत. या करारानुसार राज्यात १७२ चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी ३९ चार्जिंग स्टेशन पूर्ण झाली असून, आणखी ४५ स्टेशन पुढील तीन महिन्यांत कार्यान्वित होतील. उर्वरित स्टेशनही लवकर पूर्ण करण्यासाठी एसटी महामंडळ संबंधित कंपनीशी समन्वय साधत आहे. एसटी स्थानकांच्या २०० मीटर परिसरात अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू असल्याचे सांगत आतापर्यंत २०० हून अधिक खासगी बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रताप सरनाईक पुढे बोलताना म्हणाले की, पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी २०३५ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले आहे. सध्या कार्यरत बससह नव्याने खरेदी होणाऱ्या बसचा समावेश या योजनेत करण्यात येणार असून, जुन्या बसचेही टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर केले जाणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र हे संपूर्ण इलेक्ट्रिक एसटी ताफा असलेले देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वास ॉव्यक्त केला.

प्रताप सरनाईक पुढे बोलताना म्हणाले की, ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात एसटी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी पुढील तीन वर्षांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. बस डेपो आणि बसपोर्टचे आधुनिकीकरण, चालक-वाहकांसाठी निवास व्यवस्था तसेच आवश्यक सुविधांसाठी सुमारे २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुविधेलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, नमन, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी लोककलांचाही अनुदान योजनेत समावेश · दशावतारासह लोककला अनुदान दुप्पट; कलाकारांच्या खात्यावर थेट अनुदान जमा होणार

विद्यमान लोककला अनुदान योजनेत नमन खेळ, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या चार लोककला प्रकारांचाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *