अमित तिवारी, अभिजीत दीपके यांनी जाहिर केले बोस्टन विद्यापीठाने दिलेल्या शिष्यवृत्तीचे पत्र शैक्षणिक कर्ज घेतले होते ते आता परत करायचे असल्याचे केले स्पष्ट

पंतप्रधान मोदी यांचे समर्थक आणि सूरतस्थित अमित तिवारी याने पंतप्रधानांना जेन झी ने शिवीगाळ केल्याचा आरोप करत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या शिक्षणासाठीचा खर्च आणि अभिजीतचे वडील भगवानराव दीपके यांच्या आर्थिक स्थितीची माहिती महाराष्ट्र शासनाकडे मागितली. त्यावर अभिजीत दीपके यांनी अमित तिवारीने केलेल्या अर्जाद्वारे मागितलेली माहिती थेट त्यांना ई-मेलच्या माध्यमातून दाखवित बोस्टन विद्यापीठाने अभिजीत दीपके यांना दिलेल्या शिष्यवृत्तीचे पत्रच आज जाहिर केले. तसेच शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जातून खर्च भागविण्यात येत असल्याची माहितीही दिली.

ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांच्याशी बोलताना, अभिजीत दिपके यांनी परदेशातील उच्च शिक्षणासाठी कुटुंबाच्या अज्ञात स्रोतांतून आलेल्या पैशांचा वापर केल्याचा आरोप फेटाळून लावला.

अभिजीत दीपके म्हणाले की, माझ्या शिक्षणाचा खर्च बोस्टन युनिव्हर्सिटीने दिलेल्या शिष्यवृत्तीतून भागवला गेला. तसेच, मी काही शैक्षणिक कर्जही घेतले होते, जे मला आता परत करायचे असल्याचे सांगत अभिजीत दिपके यांनी आपले शिष्यवृत्तीचे पत्रही सादर केले.

१ ऑगस्ट रोजी, सुरत येथील रहिवासी अमित तिवारी यांनी महाराष्ट्र सरकारसह विविध प्राधिकरणांकडे तक्रारी दाखल करून अभिजीत दिपके यांचे वडील भगवानराव दिपके (जे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे -एमआयडीसी MIDC – निवृत्त कनिष्ठ अभियंता आहेत) यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली.

महिन्याला साधारण ६०,००० ते ६५,००० रुपये कमावणारा सरकारी कर्मचारी आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्याचा खर्च कसा करू शकतो, असा सवाल अमित तिवारी यांनी उपस्थित केला.

मुलाखतीदरम्यान, कॉकरोच जनता पार्टी CJP भविष्यात आपल्या उपक्रमांसाठी निधी कसा उभा करणार, या प्रश्नांवरही अभिजीत दीपके यांनी भाष्य करताना सांगितले की, कॉकरोच जनता पार्टी CJP भविष्यात ‘क्राउडफंडिंग’ (जनतेकडून निधी संकलन) करेल; आम्ही लोकांकडे पैशांची मागणी करू आणि त्याबाबत पूर्ण पारदर्शकता बाळगू, असेही सांगितले.

देशभरात झालेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटीविरोधातील आंदोलनाची आठवण सांगताना अभिजीत दिपके यांनी दावा केला की, या आंदोलनाला मोठा पाठिंबा थेट सामान्य नागरिकांकडून मिळाला होता. हे अगदी स्पष्ट असायला हवे. आंदोलनादरम्यान लोक आम्हाला अन्नाचे दान करत होते, हे तिथे आलेल्यांनी पाहिले. लोक स्वतःच्या पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन येत होते, असेही यावेळी स्पष्ट केले.

अभिजीत दीपके यांनी असाही दावा केला की, दिल्ली पोलिसांमधील काही कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाला खाजगीरीत्या पाठिंबा दर्शवला होता. दिल्ली पोलिसांमधील काही लोक आमच्याकडे आले आणि म्हणाले, आम्ही तुम्हाला पाण्याच्या बाटल्या देऊ, पण आमची ओळख उघड करू नका.’ त्यांचीही काही मुले ‘नीट’ परीक्षेची तयारी करत होती आणि त्यांना या आंदोलनाबद्दल सहानुभूती होती; म्हणूनच त्यांनी आम्हाला पाण्याच्या बाटल्या द्यायच्या होत्या, अशी माहितीही यावेळी दिली.

‘नीट’ पेपरफुटीविरोधातील आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या आंदोलकांसाठी कपिल सिबल यांनी १ कोटी रुपयांचा कायदेशीर मदत निधी जाहीर केल्यानंतर, कॉकरोच जनता पार्टी CJP च्या आर्थिक व्यवहारांकडे अधिक बारकाईने पाहिले जाऊ लागले आहे. या माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्यांनी कॉकरोच जनता पार्टी CJP च्या कायदेशीर दर्जाबाबत भारताच्या निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली असून, कपिल सिबल यांना मिळालेल्या मदतीची तपासणी करण्याची मागणी केली.

अभिजीत दीपके यांच्याव्यतिरिक्त, कॉकरोच जनता पार्टी CJP च्या प्रवक्त्या वैष्णवी गौर यांनीही या आरटीआय RTI कार्यकर्त्यावर पलटवार केला आणि एका खाजगी व्यक्तीला जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याचा आरोप त्यांच्यावर केला.

वैष्णवी गोरा यांनी त्यांच्या एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हणाल्या की, एखाद्या खाजगी व्यक्तीच्या शिक्षणाच्या खर्चाबाबत आरटीआय RTI दाखल करणाऱ्या लोकांनी ‘पीएम केअर्स’ (PM CARES) फंडाकडेही पाहावे. मोदीजी तुम्हाला माफ करतील, काळजी करू नका, असा उपरोधिक टोलाही लगावला.

संस्थेच्या निधीबाबत आणि कायदेशीर दर्जाबाबतचे प्रश्न अधिक तीव्र होत असतानाच, कॉकरोच जनता पार्टी CJP ने या तक्रारी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगून त्या फेटाळून लावल्या.

About Editor

Check Also

नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र बालेन शाह यांच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चिला १५० दिवसातच हादरे पक्षांतर्गत एकवाक्यतेचा अभाव आणि सर्वसामान्य जनता आणि युवकांशी असलेला संपर्क कमी

२७ मार्च रोजी बलेंद्र ‘बालेन’ शाह यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारून १५० दिवस झाले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *