पवारांच स्टेटमेंटच मुख्यमंत्र्यांना कळलं नाही मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते - नवाब मलिक

मुंबईः प्रतिनिधी
मुख्यमंत्री पवारसाहेबांच्या स्टेटमेंटवर गैरसमज निर्माण करत आहेत. त्यांना ते स्टेटमेंटच कळलं नाही. मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
पवारसाहेब म्हणाले होते की, पाकिस्तानातील राज्यकर्ते आणि सैन्यदलातील लोकं स्वतःच्या हितासाठी व राजकीय फायद्यासाठी भारताच्या विरोधात वातावरण निर्माण करत आहेत.
बीसीसीआयचे अध्यक्ष असताना पवारसाहेब पाकिस्तानला टीमसोबत गेले होते. त्यावेळी त्यांना तिथली सर्वसामान्य जनता भारताशी वैर आहे असं वागवत नाहीत उलट पाहुण्यांची चांगली खातिरदारी करतात असा अनुभव आल्याचा किस्सा सांगितला होता. परंतु याच वक्तव्याचा विपर्यास करून मुख्यमंत्री दिशाभूल करत आहेत. पाकिस्तानचं हित आम्हाला नाही या भाजप सरकारला आहे असा थेट आरोप त्यांनी केला.
देशातील शेतकर्‍यांच्या कांदयाला भाव मिळत असताना एमएमटीसीच्या माध्यमातून पाकिस्तानातून कांदा आयात करणाऱ्या भाजप सरकारने देशहित आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करु नये अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.

About Editor

Check Also

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा इशारा, तर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकावर दंडात्मक कारवाई नदीच्या प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडले

नदीच्या नैसर्गिक पाणी प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडल्याने शेतीला दूषित पाणी मिळत असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *