माजी पंतप्रधान हसीना शेख यांच्यासह फरार आरोपींचे प्रत्यार्पण करण्याची बांग्लादेशची भारताकडे मागणी हसीना शेख यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा पंतप्रधान तारीक रहमान यांच्या भारत दौऱ्याशी संबधित

बांग्लादेशाचे पंतप्रधान तारिक रहमान यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्याला माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या मागणीशी जोडले आहे. पंतप्रधान तारिक रहमान यांटा द्विपक्षीय दौरा पुढे जाण्यापूर्वी ‘अनुकूल वातावरण’ निर्माण करणे आवश्यक असल्याचे बांग्लादेशने म्हटले आहे.
रविवारी ढाका येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शाहिदुल करीम म्हणाले की, रहमान यांच्या भारताच्या द्विपक्षीय दौऱ्याच्या शक्यतेवर दोन्ही देशांचे अधिकारी अनेक आठवड्यांपासून संपर्कात होते.

बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शाहिदुल करीम म्हणाले की, ५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत हसीना शेख यांनी घेतलेल्या खुल्या पत्रकार परिषदेमुळे या प्रक्रियेवर परिणाम झाला. पंतप्रधान तारिक रहमान यांच्या भारताच्या द्विपक्षीय दौऱ्याच्या शक्यतेवर बांग्लादेश आणि भारताचे अधिकारी अनेक आठवड्यांपासून एकमेकांच्या संपर्कात आहेत, असेही सांगितले.

पुढे बोलताना शाहिदुल करीम म्हणाले की, मात्र, ५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत शेख हसीना यांनी घेतलेल्या खुल्या पत्रकार परिषदेमुळे ही प्रक्रिया दूषित झाली. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने त्यांना मानवतेविरुद्ध गुन्हे केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. आम्ही या प्रकरणी आमची भूमिका स्पष्ट केली असल्याचेही पुढे म्हणाले.

शाहिदुल करीम म्हणाले की, पंतप्रधान तारीक रहमान यांच्या प्रस्तावित भेटीसाठी अनुकूल परिस्थिती असणे आवश्यक आहे, असा ढाकाचा विश्वास आहे आणि त्यांनी भारताला त्यांच्या प्रत्यार्पणाच्या विनंत्यांवर कार्यवाही करण्यास सांगितले आहे. आमच्या मते, या भेटीसाठी एक अनुकूल वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

शाहिदुल करीम पुढे बोलताना म्हणाले की, यासाठी, आम्ही भारतीय अधिकाऱ्यांना शेख हसीना आणि इतर फरार गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणाच्या आमच्या विनंतीवर तातडीने कार्यवाही करण्याची आणि आमच्या द्विपक्षीय प्रत्यार्पण करारानुसार शहीद शरीफ उस्मान हादी यांच्या आरोपी मारेकऱ्यांना बांग्लादेशच्या हवाली करण्याची विनंती केली आहे. आम्ही त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत असेही यावेळी स्पष्ट केले.

या टिप्पण्यांमध्ये पंतप्रधान तारीक रहमान यांच्या प्रस्तावित दौऱ्याला ढाकाच्या दोन मागण्यांशी जोडण्यात आले आहे – हसीना आणि इतर फरार आरोपींचे प्रत्यार्पण, आणि शहीद शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येतील आरोपींना भारताच्या हवाली करणे.

बांग्लादेशने म्हटले आहे की, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय प्रत्यार्पण करारानुसार भारताने या विनंत्यांवर कार्यवाही करावी.

बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने आपल्या शेजारी देशांसह इतर देशांसोबतच्या संबंधांबाबत ढाकाच्या व्यापक दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला.

शाहिदुल करीम पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही पुनरुच्चार करतो की, सार्वभौम समानता, राष्ट्रीय प्रतिष्ठा, एकमेकांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे आणि परस्पर लाभ या आधारावर, आमच्या शेजारी देशांसह इतर देशांसोबत मैत्रीपूर्ण द्विपक्षीय संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही आमचे ‘बांग्लादेश फर्स्ट’ धोरण पुढे चालू ठेवू,” असेही सांगितले.

पंतप्रधान तारीक रहमान यांच्या प्रस्तावित द्विपक्षीय दौऱ्यासंदर्भात ढाका आणि नवी दिल्ली यांच्यात संपर्क सुरू असतानाच या टिप्पण्या आल्या आहेत, आणि आता बांग्लादेश आपल्या प्रत्यार्पणाच्या विनंत्यांवर भारताच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.

 

About Editor

Check Also

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, उपचारासाठी इम्रान खान यांना रूग्णालयात हलवा तातडीने वैद्यकीय उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्याचे आदेश

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी, तीन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात खितपत पडलेले माजी पंतप्रधान इम्रान खान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *