मनुस्मृतीच्या प्रती जाळून भाजपच्या मनुवादी वृत्तीचा मुंबई युवा काँग्रेसकडून तीव्र निषेध काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर ‘शुद्धीकरण’ करणाऱ्या भाजप-आरएसएसच्या जातीयवादी मानसिकतेविरोधात दादर येथे आंदोलन

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानी येथील सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेचा मुंबई युवक काँग्रेसने तीव्र निषेध केला. भाजप-आरएसएसच्या कथित जातीयवादी आणि मनुवादी मानसिकतेविरोधात मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील भाजप कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीच्या प्रती जाळून भाजप-आरएसएसच्या मनुवादी विचारसरणीचा निषेध केला. भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जातीयवादी मानसिकतेविरोधात आपला संताप व्यक्त केला.

यावेळी झीनत शबरीन म्हणाल्या की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करणे ही जातीयवादी मानसिकतेची पराकाष्ठा आहे. हा केवळ मल्लिकार्जुन खर्गे यांचा अपमान नसून देशातील कोट्यवधी दलित, वंचित आणि शोषित नागरिकांचा अपमान आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिलेला असताना जात-पात आणि अस्पृश्यतेच्या मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींविरोधात युवक काँग्रेस सातत्याने लढा देत राहील.

भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा अधिकार दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात जातीय भेदभाव आणि मनुवादी विचारसरणीला कोणतेही स्थान नाही. संविधानाच्या मूल्यांचे रक्षण आणि सामाजिक समतेसाठी युवा काँग्रेसचा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असा निर्धार झीनत शबरीन यांनी यावेळी व्यक्त केला.

या आंदोलनात मुंबई युवा काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन, उपाध्यक्ष हुसैन शेख, महासचिव आसिफ खान, संतोष गुप्ता, ईशान्य मुंबई युवा काँग्रेस अध्यक्ष शेखर जगताप, दक्षिण मध्य मुंबई युवा काँग्रेस अध्यक्ष प्रज्ञा ढवळे, उत्तर मुंबई युवा काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष अजयकुमार मिश्रा, उत्तर-पश्चिम मुंबई युवा काँग्रेस अध्यक्ष शिव यादव, कार्यकारी अध्यक्ष अब्दुल समद यांच्यासह प्रदेश, जिल्हा आणि विधानसभा स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर मूलभूत सुविधाही पुरविणार ‘फूटप्रिंट्स ऑफ डिग्निटी: बिल्डिंग टेन्युअर राइट्स इन अर्बन स्लम्स ऑफ इंडिया’ पुस्तकाचे प्रकाशन

झोपडपट्टीतील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात मालकी हक्काचे पट्टे देणारे नागपूर हे देशातील एकमेव शहर आहे. मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *