लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत तब्बल 71 लाख मतदान अधिक एका महिन्यात साडेसहा लाख मतदार कसे वाढले? महाराष्ट्रात एकूण 9.78 कोटी मतदार आहेत आणि आता 2.6 कोटी नावे वगळण्यात आली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार तथा नेते रोहित पवार

मुंबई : लोकसभेला 6 महिन्यात 6.5 लाख मतदार वाढले आणि लोकसभेचा निकाल पाहता विधानसभेला केवळ एका महिन्यात 6.5 लाख मतदार वाढविण्यात आले, हे मतदार कुठून आले आणि कसे आले?,लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत तब्बल 71 लाख मतदान अधिक झाले असून या संपूर्ण प्रकारात ईव्हीएम मॅनेज केले जात असल्याची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे.असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार तथा नेते रोहित पवार यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे.

 


रोहित पवार बोलताना म्हणाले की, आम्ही पिपाणी या चिन्हावर आक्षेप घेतले होते पण ज्ञानेश कुमार हा स्वतः ला राजा समजतो. आयोग याच्या बापाचे आहे का? आमचे अनेक उमेदवार हे पिपाणीमुळे पडले. आम्ही अनेक वेळा सांगूनही ऐकले नाही. मतदानाची आकडेवारी पाहिली तर एक लॉजिक लावून एक सीक्वेंसमध्ये निवडून आलेल्या आमदारांची आकडेवारी आहे. तर पराभूत उमेदवारांची आकडेवारीही तशीच आहे. आम्ही आधार कार्ड कसे चुकीच्या पद्धतीने आणि फेक तयार केले जाते याची माहिती दिली होती. शिरूर विधानसभा मतदारसंघात दुबार नावाची माहिती आहे. त्यात आम्ही शोध घेतला तर माणसेच मिळाले नाही, असे रोहित पवार बोलताना म्हणाले.

रोहित पवार म्हणाले, आम्ही चोकलिंगम साहेबांना भेटायला गेलो, ते फक्त गोड बोलतात पण प्रत्यक्ष काम काहीही करत नाहीत. आपण पश्चिम बंगालमध्येही पाहिले, तिथेही तशीच परिस्थिती होती. बंगालमध्ये मतदार वगळून भाजप जिंकली, तसेच महाराष्ट्रात 2029 मध्ये करणार आहे. बंगालचे 27 लाख मतदार अडकून ठेवले, त्यांना मतदान करता आले नाही. SIR वापरून तेथील जनता अडकवली, असे रोहित पवार यांनी सांगितले आहे.

रोहित पवार म्हणाले की, बिहारमध्येसुद्धा हाच फॉर्म्युला वापरला गेला होता. महाराष्ट्रात एकूण 9.78 कोटी मतदार आहेत आणि आता 2.6 कोटी नावे वगळण्यात आली आहेत. खडकवासला मतदारसंघात 5,76,505 मतदार होते, एसआयआरमधून 2,77,851 वगळले, पण 2024 ला 3,26,667 एवढे मतदान झाले होते. त्यामुळे येथे बाहेरून माणसे आणली गेली, त्यांच्याकडून मतदान करून घेतले गेले आणि आता त्यांची नावे वगळली जात आहेत. आता एसआयआर झाले. आम्हाला म्हटले की, याद्यांचे शुद्धीकरण केले जाईल.परंतु आम्ही जी दुबार नावे मांडली होती ती एसआयआर नंतर पुन्हा आली आहेत, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना रोहित पवार यांनी प्रेझेंटेशन देऊन पोस्टल मतमोजणी आणि ईव्हीएम मतमोजणीत मविला आणि महायुतीमध्ये किती फरक होता ते दाखवून दिलं. ईव्हीएम मॅनेज केल्याची जी चर्चा सुरु आहे ती खरी असू शकते असं वाटतं. ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात जो मोर्चा निघणार आहे, त्यात ईव्हीएम हटाओ हा सुद्धा एक मुद्दा घ्यावा असं रोहित पवार म्हणाले. ज्ञानेशकुमार राजा म्हणून बसल्यावर निवडणूक आयोग आपल्या बापाचा असल्यासारखं वागत आहेत. त्यामुळे आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं असं रोहित पवार म्हणाले. राज्यात जेव्हा लोकसभा निवडणूक झाली तेव्हा वाढलेली मतदारांची संख्या ही कमी होती पण विधानसभेच्या निवडणुकीत मात्र पाच पटीने मतदारांची नावे वाढवण्यात आली, असे रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले की,राज्याचे निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना आम्ही भेटलो आणि हे सर्व मुद्दे सांगितले पण त्यांनी यावर काहीच केले नाही. राज्यात एसआयआर मोहीम राबवली आहे. त्यात 2 कोटींहून अधिक मतदारांना वगळण्यात आलं आहे तर त्यांना नोटीस तरी देण्यात आली आहे का? आत्ता या मोहिमेची वेळ का वाढवण्यात आली आहे? पश्चिम बंगाल मध्ये देखील एसआयआर करून विधानसभा निवडणूक ही भाजपला जिंकवण्यात आली. आपल्या महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीने SIR प्रक्रिया राबविण्यात आली आहे आणि प्रत्येकी पाच मधला एक मतदार या प्रक्रियेत वगळण्यात आला आहे,असे रोहित पवार यांनी सांगितले.

रोहित पवार म्हणाले की,लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही पिपाणी चिन्हासंदर्भात आक्षेप घेतले होते. पण त्यांनी यासंदर्भात काही निर्णय घेतला नाही. आमचे अनेक उमेदवार जिंकले पण पिपाणी चिन्हाच्या उमेदवाराला मतदान चांगली मिळाली होती. चिन्हाच्या संदर्भात साधर्म्य होतं. त्यामुळे हे पिपाणी चिन्ह गोठवण्यात यावं ही मागणी केली होती. पुढे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार जिंकले होते, त्यांची मत तुम्ही बघा, अनेक जिंकलेल्या महायुतीच्या उमेदवाराना सेम मत पडली आहेत, असे रोहित पवार म्हणाले.

यावर सविस्तर बोलताना रोहित पवार म्हणाले की,भाजपच्या हातातलं बाहुलं देशद्रोही ज्ञानेश कुमार आहेत, तर पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी भोसले नाव असलेल्या एका इसमाला थेट व्हिडिओ कॉल लावला. भोसले या जिवंत व्यक्तीला एसआयआर यादीत मृत दाखविण्यात आल्याचे त्यांनी दाखवून दिले. तसेच चिंचोली (कर्जत-जामखेड) येथील परशुराम लांडघुले या स्थानिक व्यक्तीलाही कायमस्वरूपी स्थलांतरित दाखवण्यात आल्याचा पुरावा त्यांनी माध्यमांसमोर मांडला. शेवटी, लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला ईव्हीएमच्या विरोधातही मोठे आंदोलन उभारावे लागेल, असेही रोहित पवार यांनी बोलताना सांगितले आहे.

About Editor

Check Also

एसआयआरचा एकमेव उद्देश बंगाल काबीज करणे हा होता: ममता बॅनर्जी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी Mamata Banerjee यांनी शनिवारी आरोप केला की, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *