मुस्लिम आरक्षणामुळे मराठा, ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी

राज्यातील मुस्लिम समुदायाला पुन्हा आरक्षण देण्याचा निर्णय अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर करताच भाजपा नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आरक्षणामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणावर परिणाम होईल असा इशारा दिला.

विधान परिषदेत मलिक यांनी घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते.

मुस्लिम समाजाला आरक्षण दिल्यास मराठा समाजाला दिलेले आरक्षण आणि सध्या ओबीसी समाजाला देण्यात येत असलेल्या आरक्षणात कपात करावी लागेल. तसेच मुस्लिम आरक्षण दिल्यास त्याची आकडेवारी ५० टक्क्यापेक्षा जास्त जाते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वाला बाधा येत असल्याचे त्यांनी सांगितले.

हे आरक्षण देताना न्यायालयाने घालून दिलेल्या नियमातच हे आरक्षण द्यावे लागणार असल्याचे ते म्हणाले.

About Editor

Check Also

आदिती तटकरे यांची माहिती, पहिल्या टप्प्यात ५ हजार महिलांना ई-रिक्षा योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई-रिक्षा योजनेला गती

राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी (पिंक) ई-रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *