तूर साठवणुकीसाठी खासगी गोदाम ताब्यात घेणार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

तूर खरेदी गोदामाअभावी अडू नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीतील गोदामासह जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खासगी गोदाम ताब्यात घेण्याचे निर्देश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आज दिले. यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.

तूर खरेदीचा आढावा आज सहकारमंत्र्यांच्या दालनात घेण्यात आला. यावेळी राज्यभरात १९१ खरेदी केंद्रावर  ९ एप्रिलपर्यत २१ लक्ष ५० हजार ६४५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असल्याची माहिती पणन विभागाने दिली.

सहकारमंत्री म्हणाले, तूर साठवणुकीसाठी १ हजार टनापेक्षा कमी साठवणूक क्षमता असलेली लहान गोदाम सुध्दा ताब्यात घेण्यात यावेत. खासगी, पतसंस्थेची किंवा जी अन्य गोदाम  उपलब्ध होतील ती ताब्यात घ्यावीत. तसेच शेतक-यांनी १८ एप्रिलपर्यंत तूर खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

About Editor

Check Also

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील पिकांच्या स्थितीची करणार प्रत्यक्ष पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

राज्यातील काही भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतीपिकांवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *