राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला. दमणगंगा–वैतरणा–गोदावरी नदीजोड प्रकल्प, दमणगंगा–एकदरे– गोदावरी नदीजोड प्रकल्प तसेच कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा नदी खोऱ्यात वळविण्यासाठी सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह …
Read More »‘पुणे –मुंबई एक्सप्रेस वे’ वरील अपघातामुळे एसटी बसेसच्या १३९ फेऱ्या रद्द वाहतूक सुरळीत होताच बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार
पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येतील, असे …
Read More »देश के दुश्मनः काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजपाचे रवनीत सिंह बिट्टू यांच्यात वाद शीखांबद्दल आणि त्या वक्तव्यवरून वाढला वाद
बुधवारी संसदेच्या आवारात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि त्यांचे माजी सहकारी तथा केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली, ज्यामुळे दिवसाच्या कामकाजापूर्वी तणाव वाढला. हे शाब्दिक युद्ध अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी विरोधकांच्या आंदोलनादरम्यान घडले. गांधींनी, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सामील झालेल्या काँग्रेसच्या तीन वेळा खासदार राहिलेल्या रवनीत बिट्टू …
Read More »ममता बॅनर्जी यांचा सर्वोच्च न्यायालयात आरोप, निवडणूक आयोग व्हॉट्सअप कमिशन बनलेय एसआयआरच्या विरोधात मुख्यमंत्री ममता बँनर्जी सर्वोच्च न्यायालयात स्वतः हजर
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात स्वतः हजर झाल्या आणि त्यांनी पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील विविध मुद्दे मांडले. गळ्यात काळ्या रंगाचा स्कार्फ घातलेला पांढरा पोशाख परिधान करून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची व न्यायमूर्ती …
Read More »शरद पवार यांचा सवाल, मुख्यमंत्र्यांना माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार ? प्रसार माध्यामासमोर मांडली भूमिका
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला. या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरण १२ फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा करण्यात येणार होता त्या अनुषशंगाने जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचे …
Read More »मंगलप्रभात लोढा यांची माहिती, स्वयंरोजगाराला प्रोत्साहनासाठी शासन तत्पर महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उदघाटन
जगतिक पातळीवर विविध क्षेत्रात अत्यावश्यक मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता दर्जेदार कुशल मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन तत्पर आहे. राज्यात लागू करण्यात आलेली ‘पीएम सेतू योजना’ आणि ”मुख्यमंत्री महाफंड स्वयंरोजगार योजना’ हा त्याचाच प्रमुख भाग असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. कुर्ला येथील डॉन बॉस्को इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी …
Read More »मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर पालघरमध्ये 'माउंटन टनेल-6'चे खोदकाम पूर्ण
भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुरु असलेल्या निर्मितीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या हाय-स्पीड रेल कॉरिडॉरमधील पालघर जिल्ह्यातील डहाणू रोड येथील पर्वतीय बोगद्याचे (माउंटन टनल-6) खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कामाची पाहणी केली. बुलेट ट्रेनच्या ५०८ किमीच्या या प्रकल्पात महाराष्ट्रात एकूण सात बोगदे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, भांडवलशाही रायगडच्या उंबरठ्यावर, जि.प निवडणूक भूमिपुत्रांच्या हक्कांची नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास भाजपाकडून टाळाटाळ, विमानतळाला नरेंद्र मोदींचे नाव देऊनच दाखवा
हा देश मुठभर लोकांचा किंवा उद्योगपतींचा नाही तर सर्वसामान्यांचा आहे पण भूमिपुत्रांचा गळा आवळण्यासाठी भांडवलदार आसुसलेले आहेत, दोन गुजराती विकत आहेत तर दोन खरेदी करत आहेत असे चित्र देशात आहे. आता तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली भांडवलदार रायगडच्या उंबरठ्यावर आले आहेत. जिल्हा परिषदेची ही निवडणूक भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आहे, आपली परंपरा कायम राखण्यासाठी एकसंध रहा …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या ई-गव्हर्नन्स धोरणाला विभागीय माहिती कार्यालयाचा खो अमरावती विभागीय माहिती कार्यालयात ई-ऑफिस प्रणालीच नाही, महासंचालक व विभागीय आयुक्तांचेही दुर्लक्ष
राज्याचा कारभार गतिमान आणि पारदर्शक करू पाहणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ई-गव्हर्नन्स धोरणाला अमरावतीच्या विभागीय माहिती कार्यालयाने खो दिल्याचे समोर आले आहे. राज्य शासनाने १ एप्रिल २०२३ पासून मंत्रालयासह सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील शासकीय कामकाजात ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करण्यासाठी शासन परिपत्रक जारी केला आहे. मात्र अडीच वर्ष उलटून गेले तरी …
Read More »रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांची स्पष्टोक्ती, रशियन तेलाबाबत भारताचा निरोप नाही तेल खरेदीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या माहिती नंतर रशियाचा खुलासा
रशियाला रशियन तेलाची खरेदी थांबवण्याबाबत भारताकडून कोणतेही निवेदन मिळालेले नाही, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी मंगळवारी (३ फेब्रुवारी २०२६) सांगितले. रशियन माध्यमांच्या वृत्तानुसार, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी असेही सांगितले की, रशिया भारतासोबतचे संबंध सर्वतोपरीने विकसित करणे सुरू ठेवण्याचा मानस आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »
Marathi e-Batmya