Breaking News

अजित पवार यांचा इशारा…, तर शरद पवार प्रत्युत्तर देताना म्हणाले…

देशातील लोकसभा निवडणूका आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पण घराणेशाहीवर सातत्याने टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा केंद्रातील सत्ता हवी आहे. त्यामुळे घराणेशाहीतील अनेक राजकिय नेत्यांनी आर्थिक लाभ घेतला असल्याचा आरोपही भाजपाकडून करण्यात येत आहे. त्यातूनच मुळ शिवसेनेची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले केंद्रातील अदृष्य महाशक्तीच्या …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा इशारा, भाजपा-आरएसएसच्या गुंडांना …

महाराष्ट्रात फुले – शाहु – आंबेडकरांच्या विचारांना काही महत्व आहे का ? असा संतप्त सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या सोशल मायक्रो ब्लॉगिंगवर ट्विट करत केला. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, जय श्रीराम बोल म्हणत कणकवली येथील मुस्लिम व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली …

Read More »

EPFO चा मोठा निर्णय, व्याज दरात केली मोठी वाढ

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. तसेच मागील १० वर्षात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या घोषणांची उजळणी अर्थमंत्री निर्मला सीतारामण, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत देशातील जनतेला किती फायदा झाला याविषयीची माहिती दिली. दरम्यान, केंद्रीय कामदार मंत्री भूपेंद्र यादव यांनी …

Read More »

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला या दोन मुद्यांची भर घालत दिला मसुदा

सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आराक्षणासंदर्भात आंदोलने सुरू आहेत. महाराष्ट्राचे सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गरीब मराठ्यांचे आरक्षणाचे ताट आणि ओबीसी बांधवांचे आरक्षणाचे ताट वेगवेगळे असावे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने किमान समान कार्यक्रमात मांडली आहे. महाविकास आघाडीला वंचितने ३९ महत्त्वाच्या मुद्द्यांचा मसुदा सादर केला आहे, ज्याचा समावेश …

Read More »

जलजीवन मिशनसाठी जलसंधारणाची जोड व लोकसहभाग अत्यावश्यक

जल हे जीवन असून निसर्गाने आपल्याला दिलेली ही देणगी आहे. देशातील सर्वात जास्त ४० टक्के मोठी धरणे ही केवळ महाराष्ट्रात आहेत. परंतु उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या दृष्टीने जलक्रांती घडवायची असेल तर जलजीवन मिशन यशस्वीतेसाठी जलसंधारणाची जोड व लोकसहभाग अत्यावश्यक आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज शहरातील गुरू दक्षिणा …

Read More »

अजित पवार बाबा सिध्दीकी यांना म्हणाले, जनतेचे… समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी…

विरोधक राज्यपालांना सरकार बरखास्त करण्यासाठी भेटायला गेले होते. ज्या घटना घडल्या त्याचे मी समर्थन करणार नाही. परंतु राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असे भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. आपण २६ /११ ची घटना पाहिली आणि अनुभवली आहे. सरकारे येतात जातात मात्र जनतेचे, समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही काम करत आहोत …

Read More »

सीतारामण यांच्या श्वेत पत्रिकेचा पी चिदंबरम यांनी फाडला, पांढरा खोटारडेपणा…

संसदेचे हिवाळी अर्थसंकल्पिय अधिवेशनाचे आज सुप वाजले. हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावेळी मागील सरकारच्या काळातील अर्थात युपीए सरकारच्या काळातील योजना आणि खर्चावर श्वेत पत्रिका काढणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निर्मला सीतारामण यांनी युपीए काळातील …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलिसांनी जनतेचे सेवक म्हणून काम करावे

पोलीस दलात भरती होतांना घेतलेली शपथ स्मरून पोलिसांनी शासक म्हणून नाही तर जनतेचे सेवक म्हणून आपले कर्तव्य निभवावे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी येथे ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२४ च्या समारोप समारंभाप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे ग्रामविकास व …

Read More »

छगन भुजबळ यांची मागणी, … सर्वच विणकरांना उत्सव भत्ता योजनेचा लाभ मिळावा

येवला येथील पैठणी उद्योगाला चालना देण्यासाठी या ठिकाणी तुतीच्या शेतीला प्रोत्साहन देवून रेशीम उत्पादनासाठी रेशीम पार्क उभारण्याची गरज आहे. यासाठी आपले प्रयत्न असून ग्रा.पं.एरंडगाव खुर्द येथे गट नंबर २५ एकर जागा रेशीम पार्क करिता देण्यात आली आहे. त्यादृष्टीने सबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल लवकरात लवकर शासनास सादर करावा अशा सूचना …

Read More »

भाजपाची कमाई तोबा वाढली, वर्षात १३०० कोटी रूपये

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मागील १० वर्षाच्या काळात भलेही महागाई, बेरोजगारी आणि देशातील सामाजिक स्थैर्य धोक्यात येत धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या घटना वाढीस लागल्याचा आरोप सातत्याने काँग्रेससह विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर २०२२-२३ या एका वर्षात भाजपाला जवळपास १३०० कोटी रूपयांचा निधी इलेक्ट्रॉल …

Read More »