Breaking News

उद्धव ठाकरे यांचा सवाल, ४०४ ची घोषणा करता मग नितीशकुमार सोबत कशाला

अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन नुकतेच झाले. मंदिरातील राम हा काही एकट्या मोदी आणि भाजपावाल्यांचा राम नाही. तर या भारतात राहणाऱ्या करोडो राम भक्तांचा राम आहे. जसा तो तुमचा आहे तसा तो माझाही आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाला आमंत्रण आले न आल्याची वाट पाह्यली नाही. पण मी नाशिकमधील काळाराम मंदिरातील रामाची पूजा …

Read More »

अर्थमंत्री सीतारामण यांच्याकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर, पण घोषणा केल्याच

आगामी लोकसभा निवडणूकांना आता अवघ्या एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा प्रणित केंद्र सरकारचा हा शेवटचा तर निर्मला सीतारामण यांच्याकडून सहावा अंतरिम अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आला. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून विविध विभागांकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांसाठी आणि विभागांच्या खर्चासाठी फक्त लेखाअनुदान …

Read More »

हेमंत सोरेन यांचा राजीनामा, तर चंम्पाई सोरेन नवे विधिमंडळ गटनेते

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा पॅटर्न झारखंड राज्यातही राबवित झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात आले. मात्र मागील काही दिवसांपासून सातत्याने कथित कोळसाखाण घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांची ईडीकडून सातत्याने चौकशी सुरु होती. तसेच आजही ईडी अधिकाऱ्यांनी सात तास चौकशी केली. त्यानंतर अखेर हेमंत सोरेन यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी …

Read More »

राज्यातील या १७ आयएएस आणि ४४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मागील महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर ३१ जानेवारीपर्यंतच प्रथम दर्जाच्या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून मंत्रालयात विविध जिल्ह्याचे पोलिस आयुक्त आणि तर मंत्रालयासह अनेक विभागाचे प्रधान सचिव असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांनी मंत्रायलासह विभागीय आयुक्त पदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. पुढील दोन महिन्यात …

Read More »

अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २१०९ कोटींचा निधी वितरणास मान्यता

गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी  दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील …

Read More »

वाराणसी न्यायालयाचा निर्णयः ग्यानवापी मस्जिदीतील तळघरात हिंदू पुजेला परवानगी

जवळपास दोन वर्षाहून अधिक काळ उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ग्यानवापी मस्जिदीच्या जागी पूर्वी हिंदू देवस्थान होते या मागणीवरून सध्या न्यायालयीन लढाईत काही हिंदू देवस्थानची बाजू सक्षम ठरत आहे. त्यातच भारतीय पुरातत्व खात्याने केलेल्या सर्व्हेक्षणात मस्जिदीच्या तळघरात पूर्वी हिंदू धर्मियांचे मंदिर असल्याचे पुरावे पुढे आल्याने या तळघरात हिंदू पध्दतीने पुजा-अर्चा करण्याची …

Read More »

राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार गटाचे एकच मुख्य कार्यालय ?

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मंत्रालयासमोर आपले कार्यालय थाटले असले तरी या कार्यालयाला संपर्क कार्यालय असे नाव दिले असून राष्ट्रवादीचे मुख्य कार्यालय म्हणून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बॅलार्ड पियर येथील कार्यालयाचाच पत्ता दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार महायुतीच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले …

Read More »

रोहित पवार यांच्या ईडी चौकशीच्या विरोधात शासकीय कार्यालयासमोर घंटानाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांची उद्या १ फेब्रुवारी रोजी ईडी कडून पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकार विरोधात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि तहसील कार्यालय या ठिकाणी केंद्र सरकार विरोधात घंटा नाद करण्यात येणार आहे अशी …

Read More »

पत्र जारी करूनही प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘वंचित’चा अद्याप मविआत समावेश नाही

वंचित बहुजन आघाडीचा अजून महाविकास आघाडीत समावेश झाला नाहीये, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत केले आहे. नाना पटोले यांना अधिकार आहेत की नाही हे स्पष्ट नसतांना ते पत्रव्यवहार करत आहेत. आम्हाला सांगण्यात आलं होतं की, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात …

Read More »

बनावट कागदपत्रान्वये मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडून अर्थसहाय्य प्राप्त

बनावट कागदपत्रान्वये मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्थसहाय्य प्राप्त झाल्याची कबूली आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाने ठाण्यातील त्या रुग्णालयावर पोलीस आयुक्तांना गुन्हा दाखल करण्याबाबत कळविले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत बोगस प्रकरण किंवा शासनाची फसवणूक केली आहे त्याची …

Read More »