ऑगस्ट महिन्यातील जीएसटी संकलन उत्कृष्ट झाले आहे. जीएसटी संकलनात ११ टक्के वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन ११ टक्क्यांनी वाढून १.५९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ऑगस्ट महिन्यातील जीएसटी संकलनाचे आकडे जाहीर करताना वित्त मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, महिन्यातील एकूण जीएसटी महसूल १,५९,०६९ कोटी रुपये …
Read More »‘शासन आपल्या दारी’साठी मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा आरोप
येत्या ८ सप्टेंबरला राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’हा कार्यक्रम जालना जिल्ह्यात नियोजित आहे. सराटी अंतरवाली येथील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आपल्या कार्यक्रमावर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. मराठा आंदोलनावरील लाठीमार प्रकरणी आज दुपारी मुंबईत प्रतिक्रिया देताना ते बोलत …
Read More »उद्धव ठाकरे यांचा घणाघात, सरकार कोण तर एक फुल दोन हाफ… जालना येथील आंदोलकांवरील हल्ल्यावरून सोडले टीकास्त्र
इस्रोच्या शास्त्रज्ञांचे पुन्हा अभिनंदन, आता सूर्याचा अभ्यास सुरु झाला गेली सहा दशके ही संस्था काम करते आहे. त्याचा आपल्याला अभिमान. काल मिर्लेकरांनी एक मेसेज पाठवला पक्ष चोरला चिन्ह चोरले पण ठाकरेंनी मुंबईत इंडिया एकत्र करुन दाखवला. या तुमच्या शक्तीमुळेच आपल्याला हुकूमशाही विरोधी आघाडीत मानाचे स्थान. आम्ही व्यक्ती विरोधात नाही. आता …
Read More »राज ठाकरे म्हणाले,… सरकारचं चुकलं मराठा आरक्षण आंदोलकांवरील लाठीचार्ज आंदोलन
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक्सवर ट्विट करत आपली भूमिका मांडली. राज ठाकरे म्हणाले, ह्या घटनेवर मी …
Read More »अजित पवार यांची घोषणा, मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी… दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश, आंदोलकांच्या भावनांशी सहमत
“मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेबाबत मराठा बांधवांसह सर्व महाराष्ट्रवासियांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन देखील या भावनांशी सहमत असून शासनाने या प्रकरणाची गंभीर …
Read More »पवार यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस प्रत्युत्तर, शरद पवार, चिडलेले, नाराज आहेत…. मोठे नेते आहेत त्यांना उत्तर देणार नाही
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जालन्यात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामध्ये ५० हून अधिक निष्पाप नागरिक जखमी झाले आणि त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणावरून विविध राजकिय पक्षांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत या घटनेवरून जबाबदार धरण्यात येत आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार हे मुख्यमंत्री असताना गोवारी …
Read More »शरद पवार यांचा आरोप, फोन आल्यानंतरच लाठीचार्ज, गोवारी हत्याकांड…. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा
मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु असतानाच जालना येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या आंदोलकांवर पोलिस लाठीचार्ज करण्यात आला. यात मोठ्या प्रमाणावर निष्पाप लोक जखमी झाले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जालना येथील रूग्णालयात जात जखमींची विचारपूस केली. यावेळी भेटीनंतर आंदोलनकर्त्यांच्या ठिकाणी जाऊन संवाद साधला. त्यानंतर आयोजित …
Read More »काँग्रेसची वॉर रुम भाजपाच्या फेक न्यूजला सडेतोड उत्तर देणार राहुल गांधींच्या हस्ते राजीव गांधी सोशल मीडिया सेंटरचे उद्घाटन
सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय विरोधकांवर चिखलफेक करणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांची बदनामी करणे तसेच खोटी, चुकीची माहिती पसरवून समाजाची दिशाभूल करण्याचे काम भारतीय जनता पक्ष सातत्याने करत आहे. भाजपा सोशल मीडीयाचा दुरुपयोग करत फेक न्यूजही ससरवत असतो. भाजपाचा हा प्रपोगंडा हाणून पडण्यासाठी व भाजपाकडून होत असलेला अपप्रचार खोडून काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश …
Read More »नाना पटोले यांचा आरोप. ‘इंडिया आघाडी’ वरुन लक्ष वळवण्यासाठी जालन्यात लाठीचार्ज मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या फडणवीसांच्या आश्वासनाचे काय झाले ?
देशभरातील महत्वाच्या पक्षांचे नेते मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आले असताना या बैठकीचा संदेश देशभर जाऊ नये व इंडिया आघाडीच्या बैठकीपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सत्तेतील भाजपाने जालन्याची घटना घडवून आणली. आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजातील निर्दोष बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आला. हा लाठीचार्ज सरकारच्या आदेशानेच झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …
Read More »राजस्थानात मुख्यमंत्री पदासाठी वसुंधरा राजेंना भाजपाकडून “साईडलाईन” ? नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता
एकाबाजूला काहीही करून देशावरील भाजपाची अर्थात नरेंद्र मोदी यांची सत्ता अबादीत ठेवायची या उद्देशाने अनेक छोट्या-मोठ्या राजकिय पक्षात बंडखोरी आणण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरु आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावावर निवडणूका लढविण्याचा निर्णयही घेतला आहे. मात्र राजस्थानमध्ये भाजपाच्या वसुंधरा राजे यांना मात्र विधानसभा निवडणूकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रदेश भाजपाने सुरु …
Read More »
Marathi e-Batmya