महाराष्ट्र यंदा दुष्काळात होरपळतोय. राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पिके करपली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाणी, चाराटंचाई दिसताच कर्नाटक सरकारनं १९५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. मग केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार …
Read More »इंडिया आघाडीची समन्वय समिती जाहिरः या १२ संपादक-पत्रकारांच्या कार्यक्रमावर बंदी दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली बैठक
आगामी लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या इंडिया आघाडीची समन्वय समिती आज जाहिर करण्यात आली. या समन्वय समितीत काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांना स्थान देण्यात आले आहे. इंडिया आघाडीच्या समन्वय समिती आणि त्यातील सदस्यांची घोषणा नवी दिल्लीस्थित शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत करण्यात …
Read More »नवीन आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरीसह श्रेणीवर्धन व पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
राज्यातील वरुड, मोर्शी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तुमसर, पुसद, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, वसमत, गंगापूर, खुलताबाद, औंढा नागनाथ, अकोले, संगमनेर, सुरगाणा, शिरूर, आंबेगाव, मंचर, बारामती, खेड, मोहोळ, अहमदनगर आदी तालुक्यातील नवीन प्राथमिक तसेच उप आरोग्य केंद्रे, उप जिल्हा रुग्णालयांना मंजुरी देण्याबरोबरच, रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी. रुग्णालयांना वैद्यकीय …
Read More »अपात्रतेच्या मुद्दाप्रकरणी शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना दोन आठवड्यांची मुदत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती
आमदारांच्या अपात्रतेसंबंधी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या सुनावणीत काही निर्णय होईल अशी अपेक्षा होती, मात्र या प्रकरणी आमदारांना दोन आठवड्यांचा अवधी वाढवून मिळाला आहे. या मुदतवाढीसाठी न मिळालेल्या कागदपत्रांबरोबरच गणेशोत्सवाचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या आमदारांना गणपती पावला असे म्हटले जात …
Read More »सत्तेत असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याची उद्धव ठाकरेंची इच्छा नव्हती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका
अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी काहीही न करणारे उद्धव ठाकरे सध्या आरक्षण विषयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी सोडून टीका करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आपण स्वतः त्याच भाषेत उत्तर देऊ, असे केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी गुरूवारी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, मनोज जरांगेंचे उपोषण सोडण्यास देवेंद्र फडणवीस का गेले नाहीत? एकनाथ शिंदेंनी जरांगेंना दिलेल्या शब्दाला फडणवीसांचा पाठिंबा आहे का?
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरावली सराटी गावात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून उपोषण सोडले हे चांगले झाले. मुख्यमंत्री स्वतः गेले म्हणजे सरकार जरांगे यांना भेटले असाच त्याचा अर्थ होतो पण तिघाडी सरकारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे …
Read More »मुख्यमंत्री शिंदेचा मोठा निर्णयः गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच परवानगी एकदाच घ्यावी लागणार परवानगी
उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षाकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. अशी परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे गत दहा वर्षांत सर्व नियम, कायद्यांचे पालन करणाऱ्या, कोणत्याही तक्रारी नसलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांना आगामी वर्षांसाठी आणखी …
Read More »घाऊक महागाई सलग पाचव्या महिन्यात नकारात्मक ऑगस्टमध्ये दर ०.५२ टक्के
ऑगस्ट महिन्यात घाऊक महागाई वाढून -०.५२ टक्के झाली आहे. जुलै महिन्यात हा दर -१.३६ टक्के होता. सलग पाचव्या महिन्यात घाऊक महागाईचा दर नकारात्मक राहिला आहे. म्हणजेच हा दर शून्याच्या खाली गेला आहे. त्याचवेळी ऑगस्टमध्ये खाद्यपदार्थ स्वस्त झाले आहेत. अन्नधान्य महागाई ७.७५ टक्क्यावरून ५.६२ टक्क्यांवर आली आहे. अन्नधान्य महागाईचा दर कमी …
Read More »अखेर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा, शांतता राखावी, असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली-सराटी (ता. अंबड) येथे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी …
Read More »सिग्नेचर ग्लोबलचा आयपीओ २० सप्टेंबरला उघडणार ७३० कोटी रुपये उभारण्याची योजना
रिअल इस्टेट डेव्हलपर सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) चा आयपीओ २० सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहे. कंपनीला आयपीओद्वारे ७३० कोटी रुपये उभे करायचे आहेत. येत्या काही दिवसांत प्राइस बँड जाहीर केला जाईल. सिग्नेचर ग्लोबल आयपीओ अंतर्गत ६०३ कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याव्यतिरिक्त, १२७ कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर …
Read More »
Marathi e-Batmya