एक सुपरहिट सरकारी योजना आहे. यामध्ये पैसे एकत्र गुंतवून तुम्हाला मासिक उत्पन्नाची हमी मिळेल. पोस्ट ऑफिस मासिक योजना असे या सरकारी योजनेचे नाव आहे. पोस्ट ऑफिस स्कीममध्ये ५ वर्षांसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही एक हमी उत्पन्न योजना आहे. एकल खातेदार यामध्ये जास्तीत जास्त ९ …
Read More »आकासा एअर बंद होण्याचा धोका, जाणून घ्या काय आहे प्रकरण जाणून घ्या काय प्रकरण ४३ वैमानिकांनी दिले राजीनामे
देशात विमान वाहतूक क्षेत्रातील संकट अधिक गडद झाले आहे. नुकतीच सुरू झालेली आकासा एअर ही विमानसेवाही बंद होण्याचा धोका आहे. दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवलेल्या या कंपनीच्या ४३ पायलटांनी अचानक राजीनामा दिला आहे. यामुळे कंपनीला दररोज २४ उड्डाणे रद्द करावी लागत आहेत. कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, वैमानिकांच्या …
Read More »आता ओबीसीसाठीही बैठक बोलवा विजय वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन
राज्यात आरक्षणाच्या मागणीवरून मराठा, धनगर तसेच ओबीसी समाजाची राज्यभर आंदोलने सुरू असून मराठा धनगर समाजाच्या बैठकीनंतर आता ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर देखील बैठक बोलवा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. जालन्यात मराठा समाजासाठी तर अहमदनगर मधील चौडी येथे धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. पैकी …
Read More »अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘नाबार्ड’ सारख्या संस्थांकडून अतिरिक्त निधी प्रकल्पांची कामे वर्षभरात पूर्ण करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
राज्यातील जलसंपदा विभागाचे अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी नाबार्डसह इतर वित्तीय संस्थांकडून अतिरिक्त निधी उभारून सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत, राज्य शासनाकडून सर्व आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती, … गरज पडल्यास न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली समिती धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक
शासन धनगर समाजाच्या पाठीशी असून आरक्षणाबाबत जी धनगर समाजाची भूमिका आहे, तीच शासनाची भूमिका आहे. धनगर आरक्षणाबाबत शासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. धनगर समाज आरक्षणाबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागास …
Read More »विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण
राज्याच्या राजकीय वर्तुळात महत्वाच्या घडामोडी समोर येत आहेत. शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय लवकरच लागला जाणार असल्याची चिन्हे सध्या दिसत आहे. अपात्रते बाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी योग्य वेळेत घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून याबाबत दिरंगाई होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करीत ताशेरे …
Read More »जळगांव जिल्ह्यातील पीक विम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
जळगांव जिल्ह्यातील सन २०२२-२३ या वर्षातील केळी व इतर खरीप पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पीक परिस्थितीचा गुगल मॅपिंगचा डाटा घेऊन पुन्हा पडताळणी करावी. तसेच जिल्ह्यात ज्या मंडळांमध्ये २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे अशा मंडळांमध्ये अग्रीम पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश …
Read More »नव्या डेक्कन ओडिसी ट्रेन-२.० ची जाणून घ्या वैशिष्टेः राजेशाही आणि लक्झरी रेल्वेचा प्रवास डेक्कन ओडिसी ट्रेन-२.० या आलीशान व आरामदायी ट्रेनचा प्रमुख उद्देश
राज्यातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ओळख करून देणे आहे. डेक्कन ओडिसी ट्रेन २.० ही नव्या स्वरूपात आल्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनात वाढ होईल, असे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या डेक्कन ओडिसी ट्रेन-२.० या …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, दुष्काळाच्या झळांची माहिती सरकारला आहे का? राज्यावर दुष्काळाचं मोठं संकट
राज्यात गेल्या अडीच महिन्यांमध्ये अत्यंत कमी पाऊस पडला आहे. हीच परिस्थिती राहीली तर आगामी काळात दुष्काळाचं मोठं संकट राज्यावर येऊ शकतं ही शक्यता वर्तविण्यात येत आहे.राज्यात यावर्षी ३१ जुलै पर्यंत तब्बल १ हजार ५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं या परिस्थितीवरून राज्यसरकारवार निशाणा साधत दुष्काळाच्या झळा किती तीव्र आहे …
Read More »लोणावळा पर्यटन विकासासाठी प्रकल्प अहवाल महिन्याभरात तयार करावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
लोणावळा येथील टायगर, लायन्स पॉइंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा. या पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत सह्याद्री अतिथीगृह …
Read More »
Marathi e-Batmya