Breaking News

आरोग्य विभागात होणार तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती प्रक्रिया आरोग्यमंत्री डॉ सावंत यांच्या पुढाकाराने भरती प्रक्रियेला आला वेग

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु होणार आहे. तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती यामध्ये केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांनी दिली. तत्कालीन सरकारच्या काळात २०२१ साली आरोग्य विभागात राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवेळी पेपरफुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही …

Read More »

त्या टीकेवर महेश तपासे म्हणाले, शरद पवारांवर टीका करणे ही राजकीय फॅशन पवार साहेबांनी मोठे केलेले लोक ऋण विसरले मात्र जनता पवार साहेबांसोबत

महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यात दलित तरुणांना झाडावर उलट टांगून मारहाण केली या घटनेचा साधा निषेध ही बीडच्या सभेमध्ये जमलेल्या मंत्र्यांनी केला नाही याची खंत पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी बोलून दाखवली. राज्यातल्या नेते मंडळींना राज्यात वाढत चाललेल्या असहिष्णुतेच्या घटना दिसत नाहीत हे दुर्दैव आहे अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली. पुढे …

Read More »

राज्य सरकार बदलताच सरकारच्या प्रशासनाची भावनाही बदलली का? मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून माहिती अधिकार कायद्याखालील माहिती देण्यास टाळाटाळ

राज्यात तीन पक्षांचे असलेली महाविकास आघाडी सरकार जावून पुन्हा दुसऱ्या तीन पक्षांचे महाशक्तीच्या पाठिंब्याचे अर्थात महायुतीचे सरकार राज्यात स्थानापन्न झाले. मात्र हे सरकार स्थानापन्न होऊन राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विभागात गेलास अनेक अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी उत्तरे देण्यात येत असून माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज देऊनही त्यास साधे उत्तर देण्याचे सौजन्यही त्या त्या …

Read More »

नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, … ‘भाजपा चलो जाव’ चा नारा ‘इंडिया’त पंतप्रधानपदासाठी अनेक सक्षम उमेदवार, भाजपाकडेच चेहरा नाही

भाजपाच्या अत्याचारी सरकारविरोधात देशभरातील विविध राजकीय पक्षांनी इंडिया आघाडीच्या नावाखाली एक वज्रमुठ बांधलेली आहे. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर अशी दोन दिवस होणार आहे. ३१ ऑगस्टला इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण केले जाईल. महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेला मुंबईतूनच ‘चलो जाव’ चा नारा दिला होता, मोदी …

Read More »

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आणि दुष्काळग्रस्त भागातील प्रकल्पांना मदत द्या गांधीनगर येथील पश्चिम क्षेत्रिय परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत हवी त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज अहमदाबाद येथील गांधीनगर येथे पश्चिम …

Read More »

देवेंद्र फडणवीसांवरील खालच्या भाषेतील टीका यापुढे खपवून घेणार नाही भाजपा आ. प्रवीण दरेकर यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुख्यमंत्रीपद गेल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे थांबवले नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कृतीने उत्तर देतील असा इशारा भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सोमवारी दिला. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ …

Read More »

खळबळजनक : कोटा येथे ५ तासांत दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या बिहारमधील १८ वर्षीय आदर्श हा त्याच्या खोलीत सायंकाळी ७ वाजता लटकलेल्या अवस्थेत आढळून आला

Suicide

एएसपी भागवतसिंग हिंगड यांनी सांगितले की, दुपारी ३ वाजताच्या सुमारास रविवारी, लातूर (महाराष्ट्र) येथील अविष्कार संभाजी कासले (१६) याने कोटा येथील कोचिंग इन्स्टिट्यूटच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. कासले हा गेल्या तीन वर्षांपासून शहरातील तळवंडी परिसरात राहत होता आणि तो नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्टची (नीट) तयारी करत होता. …

Read More »

दिल्लीत पांढरी वाघीण सीताच्या दोन बछड्यांचा पहिला वाढदिवस थाटात साजरा नॅशनल झूलॉजिकल पार्कतर्फे उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोपटे भेट देण्यात आले आणि त्या माध्यमातून पार्कने पर्यावरणीय शाश्वततेप्रती आपल्या बांधिलकीचा परिचय घडवला

दिल्लीच्या नॅशनल झूऑलॉजिकल पार्कमध्ये सर्वांची लाडकी पांढरी वाघीण, सीता’चे जुळे बछडे, अवनी आणि व्योम यांचा पहिला वाढदिवस मोठ्या आनंदात आणि थाटामाटात साजरा झाला. या समारंभासाठी पाहुणे होते, पर्यावरण आणि वन तसेच हवामान बदल विभागाचे महसंचालक चंद्र प्रकाश गोयल, आणि केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. एस.के. शुक्ला. ह्या सोहळ्याचे वैशिष्ट्य …

Read More »

पंतप्रधान सोमवारी रोजगार मेळाव्यात ५१ हजारांहून जास्त नियुक्तीपत्रे करणार प्रदान रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल

सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता दूरदृश्यप्रणाली द्वारे ५१,००० हून अधिक नियुक्तीपत्रे प्रदान करतील. यावेळी पंतप्रधान या नवनियुक्त कर्मचाऱ्यांना संबोधित करतील. हा रोजगार मेळावा देशभरात ४५ ठिकाणी होणार आहे. या रोजगार मेळाव्या द्वारे, केंद्रीय राखीव पोलीस दल (सी आर …

Read More »

Nuh : हरियाणातील नुह येथे आज जलाभिषेक यात्रा, सीमा सील, सर्वत्र पहारा यात्रेत सहभागी लोकांना सीमेवरच थांबवले जाईल.

Nuh

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आवाहनावर आजच्या जलाभिषेक यात्रेच्या संदर्भात प्रशासनात जोरदार तयारी सुरू आहे. मागील Nuh घटनेपासून धडा घेत प्रशासनाने जिल्ह्याच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. शनिवारी दुपारपासून इंटरनेट सेवा बंद आहे. जिल्ह्यात खबरदारीचा प्रतिबंध (कलम 144) लागू आहे. नल्हार मंदिराभोवती सुरक्षा वर्तुळ मजबूत करण्यात आले आहे. २८ …

Read More »