Breaking News

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण समितीने घेतला राज्याचा आढावा राज्याच्या योजनांचा घेतला आढावा

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण विषयक संसदीय समितीने आज राज्याच्या अनुसूचित जाती, जमातीबाबत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला. ही बैठक खासदार किरीट सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण संसदीय समितीची हॉटेल ताज येथे आज बैठक झाली. या बैठकीस समितीचे सदस्य उपस्थित होते. …

Read More »

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता गतीने वितरित करा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत कृषी आयुक्त सुनील चव्हाण, महा आयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, कृषी संचालक दिलीप झेंडे, …

Read More »

आता अधिकृतरित्या मुंबई महाराष्ट्र सरकारच्या प्रशासनाकडून दिल्लीच्या ताब्यात नीति आयोगाकडे मुंबईच्या आर्थिक विकासाचे कंत्राट

देशाच्या आर्थिक विकासात मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व नेहमीच केंद्रातील कोणत्याही सरकारने कधी नाकारले नाही. मात्र मुंबईसह राज्यात कोणत्या स्वरूपाची आर्थिक विकास केंद्रे, पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात याबाबतचा निर्णय जरी केंद्र सरकारकडून घेण्यात येत असे. मात्र त्यातील धोरणात्मक आणि विकासात्मक कार्यक्रमांची अंमलबजावणी नेहमीच ही राज्य सरकारचा वाटा महत्वाचा राहिला आहे. त्यामुळे …

Read More »

इंडियाच्या धर्तीवर भाजपासह एनडीएची बैठक मुंबईत होणार

भारतीय जनता पार्टी , शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची संयुक्त बैठक ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार असल्याची माहिती महायुतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि भाजपा आ. प्रसाद लाड यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत, …

Read More »

‘इंडिया’ आघाडीमुळे घाबरलेल्या मोदींची घाईघाईत ३८ पक्षांची बैठक नाना पटोले म्हणाले, ... मोदींचा पराभव करणे हाच उद्देश

देशातील हुकुमशाही मोदी सरकारने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली पण राहुल गांधी मोदींच्या हुकुमशाहीला न डगमगता निर्भीडपणे सामोरे गेले. देशभरात भितीचे वातावरण असताना ‘डरो मत’ असा संदेश देणाऱ्या राहुल गांधी यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात करावा, ही काँग्रेसची भावना होती म्हणूनच …

Read More »

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे मंत्रालयात अनोखे आंदोलन (व्हिडिओ) ५-६ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मंगळवारी आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर चढून हल्लाबोल आंदोलन केले. ऐनवेळी आंदोलनकर्त्यांनी मंत्रालयातच आंदोलन सुरु केल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर पोलिसांनी सुरक्षा जाळीवर चढत ५ ते ६ आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान आंदोलकांनी मंत्रालयातील जाळीवर उड्या टाकून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी …

Read More »

खुशखबर! आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू… आरोग्य विभागात ११ हजार पदं भरली जाणार आहेत. भरतीप्रक्रियेसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभाग भरती ही माहिती दिली

आरोग्य विभाग भरती

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास ११ हजार पदांसाठीची जाहिरात आज आली आहे. राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. आरोग्य विभाग ग्रुप क आणि ग्रुप ड या दोन विविध जिल्ह्यांच्या जाहिराती आज म्हणजेच मंगळवारी प्रसिद्ध झाल्या आहेत. या भरती अंतर्गत गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा …

Read More »

आशिष शेलार यांचा सवाल, उद्धव ठाकरेंचा मातोश्री ३ चा प्लॅन आता चंद्रावर नाही ना….? हिंगोलीतील सभेतील उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर शेलारांचा पलटवार

पाकिस्तानने शुभेच्छा दिल्यानंतर चंद्रयान मोहिमेच्या शुभेच्छा आणि अभिनंदन उद्धवजी तुम्ही का केलं? त्या अगोदर तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन का केले नाही? अशी कुठली गोष्ट तुमच्या मनाला टोचत होती? जी भारताने कमावली, शास्त्रज्ञांनी मिळवली, जगाने पाहिली, पण मला नाही बरी वाटली अशी कुठली गोष्ट होती? तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं नाही? एक पत्र, …

Read More »

सुनिल तटकरे म्हणाले, आम्ही जो विचार घेऊन सत्तेत सहभागी… बीडच्या उत्तरदायित्व सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद...

राज्याचे विकासाभिमुख उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पिंपरी-चिंचवड, बारामती आणि बीडमध्ये झालेले स्वागत पाहून आम्ही जो विचार घेऊन सत्तेत सहभागी झालो, त्याला जनतेमधून पाठिंबा मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीडमधील ‘उत्तरदायित्व सभेला’ मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सुनिल …

Read More »

जे जे रुग्णालयात यकृत रोपण सुविधा उपलब्ध करुन देणार मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

सर्वसामान्य रुग्णांना माफक दरात सर ज. जी. (जे.जे.) रुग्णालयात यकृत रोपण सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. सर ज.जी.रुग्णालयात विविध विषयांवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे …

Read More »