Breaking News

३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, प्रतापगड प्राधिकरणची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ४५ एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन ५० कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर झालेल्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

दहावी निकालात कोकण पुन्हा अव्वलः तर मुलींची टक्केवारी अधिक शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन- दीपक केसरकर

दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण …

Read More »

नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य, …कोण कोणाला भेटतो यांच्याशी आमचे देणेघेणे नाही अदानी-मोदींचे संबंध काय? आणि २० हजार कोटी कुठून आले? हे प्रश्न आजही कायम

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी दोन दिवस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. आगामी निवडणुकीत मोठा विजय कसा संपदान करायचा यावर या बैठकीत विचारमंथन केले जाणार आहे. प्रत्येक जागेचा आढावा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेस पक्षाची राज्यातील प्रत्येक मतदारसंघात संघटनात्मक ताकद आहे. काँग्रेस पक्ष सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार असला तरी त्याचा आघाडीच्या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे स्पष्ट संकेत, नवी मुंबईतील रहिवाशांना मिळणार मालमत्ता कर माफी नवी मुंबईतील घरांना मालमत्ता कर माफी देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्याकरिता नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, सिडकोचे व्यवस्थापकीय …

Read More »

आता ‘खेळाडूंसोबत राष्ट्रवादी’, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून घोषणा… दिल्लीच्या घटनेनंतर खेळाडूंचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आवाहन

देशभरातील खेळासारख्या अत्यंत पवित्र क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचे खचलेले मनोबल सावरण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील खेळाडूंशी राष्ट्रवादी काँग्रेस संवाद साधणार असून ‘खेळाडूंसोबत राष्ट्रवादी’ या अभियानाची सुरुवात करत असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फेसबुक लाईव्हद्वारे केली. या अभियानांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, …

Read More »

अखेर या गोष्टीसाठी मुंडे भाऊ-बहिण आले एकत्र मुंडे भाऊ बहीण एकत्र आल्याने वैद्यनाथ साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध

बीड जिल्ह्यातील राजकारणात कट्टर विरोधक असलेल्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भाऊ-बहिणीने जिल्ह्यातील राजकारणात प्रथमच एकत्र आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुक जाहिर झाल्यानंतर पुन्हा बहिण-भावामध्ये कोण बाजी मारणार अशी चर्चा सुरु असतानाच अखेर ही निवडणूक बिनविरोध झाली. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, पंढरीच्या आषाढी वारीसाठी टोल माफ रस्त्यांची दुरूस्ती, स्वच्छता-पाणी-आरोग्य सुविधांवर लक्ष द्या- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. पंढरीत दर्शनासाठी येणाऱ्या …

Read More »

नाना पटोले यांची टीका, … पण अहिल्यादेवींसारखा कारभारही करुन दाखवा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी कधीच द्वेषाचे राजकारण केले नाही

शिंदे-फडणवीस सरकारने अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवीनगर करण्याची घोषणा केली, त्याचे काँग्रेस पक्ष स्वागतच करत आहे. पण मुळात या सरकारकडे जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून शहरांची नावं बदलण्याचे काम सुरु आहे. शहराचे नाव तर बदलले पण राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या पद्धतीने समाजकार्य केले, सर्वधर्म समभावाला घेऊन पुढे गेल्या, त्या विचारांवर शिंदे-फडणवीस …

Read More »

पंकजा मुंडे यांच्या त्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,…. विपर्यास मी भाजपाची, पण भाजपा माझा नाही

पंकजा मुंडे, भाजपा माझ्या पाठीशी आहे असंच म्हणाल्या मात्र त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा खुलासा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना स्पष्ट केले. मी भाजपाची आहे, पण भाजपा थोडीच माझा आहे’, असे जाहीर वक्तव्य करून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आपला उद्ग्वेद व्यक्त केल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आले. त्यानंतर …

Read More »

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण पुनर्विकास योजनेअंतर्गत शासन निर्णय जारी इमारत पुनर्विकास धोरणाबाबत शासन निर्णय निर्गमित

मागासवर्गीय व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेअंतर्गत इमारतींचे पुनर्विकास धोरण जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. याबाबतचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय ३१ मे २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांनी त्यांना दिलेल्या भूखंडावर इमारतींचे बांधकाम करुन आता ५० ते …

Read More »