महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वारी मार्गावरील पेनूर टोल प्लाझाची प्रस्तावित टोल वसुली प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय भूतल परिवहन मत्रीनितीन गडकरी यांना केली आहे. यावर्षी आषाढी यात्रा २९ जून रोजी होणार आहे.सुमारे सात लाख भाविक व त्यांची …
Read More »पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांसाठी मेगा भरती; जाणून घ्या अर्ज करण्याची व परिक्षेची ताऱीख पदुम मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. याच अंतर्गत पशुसंवर्धन विभागातील सरळसेवा कोटयातील विविध ४४६ रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. २७ मे म्हणजे उद्यापासून सकाळी १०.०० वा. पासुन अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे, तर …
Read More »अतुल लोंढे यांची टीका, नेहरुंचे नाव कोट्यवधी लोकांच्या मनातून कसे हटवणार नेहरु नावाची ऍलर्जी असल्यानेच हैदराबादमधील बँकींग संस्थेचे नामकरण
भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल अत्यंत घृणा आहे. नेहरु नावाची ऍलर्जीच त्यांना जडलेली आहे म्हणून नेहरुंची सातत्याने बदनामी केली जात आहे. पंडित नेहरु यांचे नामोनिशान मिटवण्यासाठी त्यांचा आटापिटा चाललेला असून त्याच विकृत मानसिकतेतून हैदराबादमधील जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स या संस्थेचे नाव …
Read More »सहकार मंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन, अन खात्यात ५० हजारांचे अनुदान नियमित कर्जफेड करणाऱ्या १२ शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान जमा
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांच्या अनुदानापासून वंचित असलेल्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या १२ शेतकऱ्यांना सहकार मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाच्या एका फोनवरून अनुदान मिळण्यास मदत झाली आहे. राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांपर्यंत लाभ …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य, …और मुझे रास्ते बनाने का समृध्दी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील उद्घाटनानंतर केले वक्तव्य
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शुक्रवारी २६ मे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिर्डीजवळील कोकमठाण येथे झालं. त्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी आणि कोपरगावातील शेतकऱ्यांचं आभार मानले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचा विकास …
Read More »नाना पटोले यांची माहिती, लोकसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीसाठी मतदारसंघनिहाय बैठका… धर्मांध व जातीवादी भाजपाला पराभूत करणे हेच काँग्रेस पक्षाचे लक्ष्य
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महत्वाची बैठक बोलावली आहे. टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी लोकसभा मतदारसंघ निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला राज्यातील सर्व प्रमुख नेते व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रत्येक मतदारसंघाचा सर्वबाजूने विचार केला जाणार आहे. धर्मांध …
Read More »गजानन किर्तीकर यांचा इशारा, …तर आमची कामं झाली पाहिजे…पण आम्हाला सापत्न वागणूक… १३ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासबोत आलो
मागील वर्षी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १३ खासदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर भाजपाबरोबर जात एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. पण, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं दिसत आहे. अशातच खासदार गजानन किर्तीकर यांनी केलेल्या …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या राजकीय निर्णयाच्या विरोधात मुंबईवर एकटवले मुंबईतील खुल्या जागा, खेळाचे मैदान आणि मनोरंजन मैदानाचे सद्याचे धोरण बदलण्याची हालचाल
मुंबईतील खुल्या जागा, खेळाचे मैदान आणि मनोरंजन मैदानाचे सद्याचे धोरण बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्त यांस आदेश जारी केले असून त्याविरोधात बॉम्बे कॅथोलिक सभेने एका सभा माहिम येथील सेंट मायकल सभागृहात आयोजित करण्यात आले होते. खाजगी संस्थेस किंवा व्यक्तीस दत्तक देण्याऐवजी शासन आणि पालिकेने या जागेच्या परिरक्षण करण्यावर सर्व वक्त्यांनी भर …
Read More »फडणवीसांच्या त्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर,… तर फेकण्यात तज्ञ मुख्यमंत्री गारूडी तर उपमुख्यमंत्री फेकण्यातले तज्ञ
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी २४ मे रोजी भेट घेतली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. कितीही सापनाथ-नागनाथ एकत्र आले, तरी मोदींना पराभूत करू शकणार नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. याला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. …
Read More »नवीन संकल्पना अंमलात आणून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
यावर्षी साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव हा नवीन संकल्पना अंमलात आणून साजरा करावयाचा आहे. लोकमान्य टिळक यांनी जो हेतू समोर ठेवून गणेशोत्सव सुरू केला, त्या हेतूची जनजागृती करणारा गणेशोत्सव असावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई गणेशोत्सव पूर्व तयारी बाबत बैठकीचे आयोजन करण्यात …
Read More »
Marathi e-Batmya