Breaking News

राज्य सरकारची नवी घोषणा, अडीच लाखात झोपडीधारकाला घर; शासन निर्णय वाचा गृहनिर्माण विभागाकडून शासननिर्णय जारी

सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्षरित्या शिंदे-फडणवीस सरकारवर अपात्रतेवर शिक्का मोर्तब केल्यानंतर राज्यात विधानसभा-लोकसभा निवडणूका घेण्याच्या चर्चेला सुरुवात झाली. तर दुसऱ्याबाजूला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाही जाहिर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर काहीही करून मुंबई महापालिका ठाकरे गटाच्या ताब्यातून हिसकावून घ्यायचीच याचा चंग बांधलेल्या भाजपा-शिंदे गटाने आता मुंबईकरांसह राज्यातील झोपडीधारकांना खुष करण्यासाठी अडीच लाख …

Read More »

भेटीनंतर शरद पवार यांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन,…काळाची गरज राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करणार

देशातील लोकशाही वाचवण्यासाठी भाजपाविरुध्द सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले. दिल्लीतील आप सरकारविरोधातील विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील असे आश्वासन शरद पवार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिले. अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान व आपच्या …

Read More »

नाना पटोले यांची थेट पोलिस महासंचालकाकडे मागणी, ती पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करा… पोलीस भरती प्रक्रियेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करा

पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राज्यातील हजारो मुला-मुलींसाठी मुंबईतील ७ मे २०२३ रोजीची पोलीस भरती परिक्षा ही एक मोठी संधी होती. परंतु या पोलीस भरतीमध्ये अनुचित प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. या परिक्षेत मोठ्या प्रमाणात हायटेक कॉपी करण्यात आली. कमी मार्क असलेल्या मुलांना पात्र ठरवण्यात आले, यासह भरतीसाठी मुलांकडून …

Read More »

अजित पवार यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र, …तातडीने कार्यक्रमांचे आयोजन करा ७५ कोटी रूपयांचा निधी मंजूर पण एकाही कार्यक्रमाला मंजूरी दिली नाही

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वपक्षियांना सोबत घेत राज्य सरकार मोठा कार्यक्रम घेणार असून ते कार्यक्रम वर्षभर राबवू असे आश्वासन दिले. मात्र त्यास आता तीन महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप कोणतीच कृती राज्य सरकारने केली नसल्याने …

Read More »

१२ वीचा निकाल जाहिरः कोकणचा सर्वाधिक तर मुंबईचा सर्वात कमी टक्क्याचा बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले अभिनंदन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. राज्यात एकूण ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी …

Read More »

काँग्रेसने हकालपट्टी केल्यानंतर आशिष देशमुख यांनी काकाच्या विरोधात ठोकला शड्डू बाजार समितीच्या अध्यक्षाच्या विरोधात आणला अविश्वासाचा प्रस्ताव

भाजपामधून पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केलेल्या माजी आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जाहिररित्या करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले हटाव मोहिमही सुरु केली. अखेर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने माजी आमदार आशीष देशमुख यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली. विशेष म्हणजे देशमुख …

Read More »

शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी सहकार विभाग पाठपुरावा करणार सहकार मंत्री अतुल सावे यांचे निर्देश

मोसमी पावसाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत. शेतकरी खरीप हंगामाची पूर्व तयारी करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बि- बियाणे, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी बँकांनी पीक कर्ज वेळेत द्यावे आणि त्याचा पाठपुरावा सहकार विभागाने करून अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी …

Read More »

१२ वीचा निकाल जाहिरः ९० टक्क्याहून अधिक गुण मिळविणारे घटले मुलांपेक्षा मुलींची उत्तीर्ण होण्याची संख्या जास्त

सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते. विद्यार्थी, पालकांना दुपारी दोन वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल. निकालातील महत्त्वाची बाब म्हणजे, एकूण निकाल घटण्याबरोबरच यंदा ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेले गुणवंत घटले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या १२ वीच्या परीक्षेचा …

Read More »

नोंदणीकृत कामगारांची संख्या वाढवून सुविधा द्या कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे निर्देश

राज्यात असंघटीत क्षेत्रातील कुठलाही कामगार नोंदणीपासून वंचित राहू नये. यासाठी विभागाने कामगारांची मोहिम स्तरावर नोंदणी करावी. नोंदणीकृत कामगारांना सुविधांचा लाभ द्यावा, असे निर्देश कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री खाडे बोलत होते. बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद …

Read More »

विरोधकांच्या बहिष्कारावरून देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, मग ते लोकशाही विरोधी होतं का? मोदींना विरोध करण्याचा ज्वर चढला

नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना बोलावलं नाही त्यामुळे आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार घालत आहेत. यासंदर्भातलं एक पत्रकही विरोधकांनी जारी केलं आहे. याबाबत जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी यावर खरमरीत उत्तर दिलं …

Read More »