Breaking News

शिंदे गटाच्या आमदाराने केली शिफारस अन नियमबाह्य पध्दतीने उंदीर घोटाळ्यातील अभियंत्याला बढती मुख्य अभियंता रणजीत हांडे यांना कार्य अहवाल सादर करण्याचे आदेश

विधानसभेत गाजलेला उंदीर घोटाळ्यातील मंत्रालयातील सार्वजनिक विभागातील शाखा अभियंता कु. रेश्मा चव्हाण यांच्यासाठी बांधकाम मंत्र्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांच्याकडे मुख्य अभियंता रणजीत हांडे यांनी आमदार निवास उपविभागाच्या अतिरिक्त कार्यभार सोपवल्याची गंभीर तक्रार विधानसभेतील शिवसेनेचे विधीमंडळ मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांनी राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केल्याने त्यांची मंत्री …

Read More »

एफ. सी. बायर्न महाराष्ट्र फुटबॉल करंडक स्पर्धेच्या लोगोचे अनावरण एफसी बायर्नबरोबरच्या करारामुळे राज्यातील फुटबॉल खेळाडू करतील उज्ज्वल कामगिरी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जर्मनीतील एफ. सी. बायर्न म्युनिक फुटबॉल क्लबबरोबर राज्याने केलेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातील फुटबॉल खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात एफ. सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धेच्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत …

Read More »

पिंपरी-चिंचवड उमेदवारीवरून अजित पवार म्हणाले, बोलणं झालं उध्दव ठाकरेंचा आघाडीला पाठिंबा ज्यांनी उमेदवारी मागितली त्यांनी शांत रहावं यासाठी प्रयत्न

पिंपरी चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीने ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतली. सुरुवातीला या जागेसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेने माघार घेतली. मात्र ठाकरे गटाचे संभावित उमेदवार राहुल कलाटे यांनी महाविकास आघाडीचे अर्थात राष्ट्रवादी …

Read More »

थोरात यांच्या राजीनाम्यावर नाना पटोले म्हणाले, शुभेच्छा, त्यांचा राजकिय उत्कर्ष होवो माध्यमांशी थोरात बोलत असतील तर त्यांनीच विचारावं

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, आज त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना त्यांचा राजकिय उत्कर्ष होवो अशा सकाळीच शुभेच्छा दिल्या. तसेच थोरात यांनी राजीनामा दिला …

Read More »

अजित पवारांनी पुन्हा केला गौप्यस्फोट, बाळासाहेब थोरातांनी दिला गटनेते पदाचा राजीनामा वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना थोरातांना विचारल्यानंतर त्यांनीच माहिती दिल्याचा केला दावा

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून सुरू झालेला काँग्रेस पक्षांतर्गत संघर्ष आणखी चिघळला असून सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीवरून आणि सत्यजीत तांबेच्या विजयाचे भाकित करणारे याशिवाय सत्यजीत तांबे हे भाजपासोबत जाणार नसल्याचे आणि शिवसेनेतील बंडाच्या माहितीचा गौप्यस्फोट करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात …

Read More »

भाजपाही करणार मुख्यमंत्री शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम पण(?) घोटाळ्यातील दलाल आणि संबधितांचे कनेक्शन गोळा करण्याचे काम सुरु

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील नंबर दोनचे नेते राहिलेले विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार ते मागील आठ वर्षात नगरविकास मंत्री म्हणून काम करत असतानाच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या व्यक्तींनी आणि समर्थकांनी केलेल्या कामांची माहिती गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती पुढे आली असून त्यासाठी भाजपाची खास टीम …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा थेट मोदींना सवाल, अदानी प्रकरणावर चर्चा का नको? अदानी मुद्द्यावर चर्चा होऊ नये यासाठी हे सरकार जोरदार प्रयत्न करतेय

गौतम अदानी प्रकरणावरून काँग्रेससह विरोधी पक्ष आक्रमक होऊ लागले आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, संसदेत गौतम अदानी प्रकरणावर नरेंद्र मोदींना चर्चा नको आहे. परंतु देशाला समजलं पाहिजे की, अदानीच्या मागे कोणती शक्ती ठामपणे उभी …

Read More »

भाजपाने मुक्ता टिळकांच्या कुटुंबियांना उमेदवारी न दिल्याने आनंद दवे उभारणार टिळक कुटुंबियांची भेट घेत भाजपाला दिला इशारा

भाजपाने कसबा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांपैकी कोणालाही उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. कुटुंबियांपैकी कोणालाही संधी न दिल्याने शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अनेक घडामोडींना वेग आला आहे. हिंदू महासंघ संघटनेचे आनंद दवे यांनी शैलेश टिळक यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी आपण …

Read More »

पुढील वर्षापासून शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करणार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आजी आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधार स्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पुढील वर्षापासून १० सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त शाळेत आजी आजोबांसमवेत विविध उपक्रमांचे आयोजन …

Read More »

आदित्य ठाकरेंचा सवाल, ते ४० गद्दार सांगू शकतात का? राज्यातील जनतेला बंडखोरी आवडलेली नाही

शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर असून बंडखोर शिंदे गटावर टीका केली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात वातावरण इतकं पेटलं आहे जर आजच निवडणूक झाली तर निकालानंतर एकच रंग दिसेल तो म्हणजे भगवा भगवा आणि भगवा. आता काही लोक विचारतील की भगवा रंग कुणाचा? कुठल्या गटाचा? तर …

Read More »